10 May 2024 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या मुसक्या आवळा | स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना पत्र

Sagar Khot

कोल्हापूर, ०८ सप्टेंबर | दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकिरण माने यांना त्यांच्या घरी जात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह साथीदारांनी मारहाण व शिविगाळ केली. यामुळे स्वाभिमानी आणि खोत यांच्यात वाद उफाळला आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या मुसक्या आवळा, स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना पत्र – Swabhimani Shetkari party made complaint against Sagar Khot :

राजु शेट्टी यांच्या सोबत काम करतो हा राग मनात धरून त्यांनी रविकिरण माने यांना धमकावले. याविषयी माने यांनी कासेगाव येथील पोलिस ठाण्यात सागर खोत सह अन्य साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

याबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा कारनामा बागल यांनी सांगितला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व शिवसेना सोलापूर विधानसभा अध्यक्ष सागर तांबोळकर उपस्थित होते.

यावेळी संशयित आरोपी सागर खोत व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी व समाजामध्ये दहशत पसरवू पाहणाऱ्या खोत यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी राज्याचे गृहमंत्री नामदार वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांची अतिशय सकारात्मक चर्चा झाली. तातडीने याबाबत गृहविभागाकडून तातडीने कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली असल्याचे बागल यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Swabhimani Shetkari party made complaint against Sagar Khot.

हॅशटॅग्स

#RajuShetti(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x