3 May 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कोल्हापूर आंबेओहोळ प्रकल्प | चंद्रकांत पाटलांना लाज वाटली पाहिजे | हसन मुश्रीफ यांची टीका

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर, ०९ सप्टेंबर | आंबेओहोळ प्रकल्पाचे काम गेली दहा वर्ष रखडले होते. मी मंत्री असताना हा प्रकल्प मंजूर केला. मात्र, आज याचे कोणीतरी श्रेय घेत असल्याचे मी पाहिले. जे श्रेय घेत आहेत, तेच लोक घळ भरणीच्या वेळी न्यायालयात गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

कोल्हापूर आंबेओहोळ प्रकल्प, चंद्रकांत पाटलांना लाज वाटली पाहिजे, हसन मुश्रीफ यांची टीका – Minister Hasan Mushrif slams BJP state president Chandrakant Patil over Ambe Ohol Project :

तुम्ही दहा वर्षे आमदार असताना हा प्रकल्प का रखडला? असा सवालही मुश्रीफ यांनी केला. आज आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाणी पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाचे आज पाणी पूजन कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. मुश्रीफ यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प मार्गी लागला.

प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होणार:
आंबेओहोळ या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेती सुजलाम-सुफलाम बनेल. या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाचे काम करण्यासाठी मुश्रीफ हे प्रयत्न करत आहेत. याचे सर्व श्रेय त्यांना मिळायला हवे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

रखडलेला प्रकल्प मार्गी लागल्याचा आनंद:
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आज मार्गी लागत आहे, याचा आनंद आहे. शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला दिला जाईल. जोपर्यंत शेवटच्या प्रकल्पग्रस्तला मदत मिळवून देत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.

आंबेओहोळ हा प्रकल्प पहिल्यापासूनच राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आज याचे पाणी पूजन कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. मात्र, यासाठी भाजपने निधी मंजूर केला असल्याचा पोस्टर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समर्जित घाटगे यांनी लावला आहे. तर, त्याच्या बाजूलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुश्रीफ यांच्या आभाराचे पोस्टर लावल्याने श्रेय वादाची पोस्टरबाजी, अशी चर्चा रंगू लागली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Hasan Mushrif slams BJP state president Chandrakant Patil over Ambe Ohol Project.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x