Health First | दुपारी जेवताना भात खाल्ला कि झोप का येते? | ही आहेत कारणे आणि उपाय

मुंबई , ११ सप्टेंबर | भात हा असा पदार्थ आहे ज्यात एकतर भरपूर विविधता मिळते. अर्थात उत्पादनात मिळतेच पण पदार्थांमध्येसुद्धा विविधता मिळते. पहा ना व्हेज पुलाव, तवा पुलाव, जिरा राईस, कढी राईस, दालखिचडी, दम बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी आणि अजून बरंच काही.. त्यामुळे भट खाणाऱ्यांची एक वेगळाच चाहता वर्ग आहे. अगदी साध्या वरणभातापासून निरनिराळ्या भाताचे प्रकार कित्येक लोक अगदी चवीने आणि मनसोक्त खातात.
दुपारी जेवताना भात खाल्ला कि झोप का येते?, ही आहेत कारणे आणि उपाय – Causes and remedies over sleep after eating rice in the afternoon :
पण आजकाल वाढते वजन हि इतकी मोठी समस्या झाली आहे कि, डाएटचे एक नवे फॅड आले आहे. त्यामुळे सर्रास अनेक लोक डाएट चार्ट फॉलो करताना दिसतात. मुख्य म्हणजे सहसा डाएटमधून भात स्किप करण्याचा एक वागलास अट्टाहास असतो. पण कितीही विचार केला तरी न राहवून घासभर तरी भात खाल्ला जातोच. कारण काहिंना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखेच वाटत नाही.
पण भट तुमच्यासाठी कितीही जीव का प्राण असेना त्याचे दुपारच्या जेवणात असणे नक्कीच महागात पडू शकते. कारण दुपारी भात खाल्ला कि खूप सुस्ती येते आणि मग सारखं आडोसा मिळावा आणि झोपून जावं असं वाटतं. काहींना ऑफिसमध्ये डब्यात भात खाण्याची सवय असते. या भात खाण्याच्या सवयीमुळे कामात व्यत्यय येतो. कारण भात खाल्ला तर झोप येणार यात काही वादच नाही. म्हणूनच आपण आधी दुपारच्यावेळी भात खाण्यामुळे झोप का येते? हे जाणून घेऊ आणि त्यानंतर झोप येऊ नये म्हणून काय करता येईल हे जाणून घेऊ.
Why we feel drowsy after eating rice in afternoon?
दुपारी भात खाण्यामुळे झोप का येते?
मुळात भातात कार्ब्स आणि ग्लुकोज अधिक असते. त्यामुळे भात खाण्याने इन्सुलीनची पातळी वाढते. ज्याचा परिणाम थेट मेंदू्च्या कार्यप्रणालीवर होतो. शिवाय शरीरात हॉर्मोनल बदल होतात आणि झोपेच्या हॉर्मोन्सला चालना मिळते. म्हणूनच दुपारी असे नव्हे पण कधीही भात खाल्ल्यात तरी आळस येतो. सुस्ती येते आणि मग झोप येते. मुळात भात जेवल्यावर झोप येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे यात घाबरण्याचे कारण नाही. मात्र दुपारी जर तुम्ही भात खाणार असाल तर तुम्हाला काम करताना झोप येते परिणामी कामात अडथळा येतो.
दुपारी भात खाताना काय काळजी घ्यावी?
तुम्हाला भात आवडत असेल तर निश्चितच तुम्ही त्याबाबत आग्रही असाल. त्यामुळे भात खा पण काही गोष्टींची काळजी घ्या म्हणजे दुपारची झोप नियंत्रणात राहील. यात मुख्य म्हणजे भात खाण्याचे प्रमाण कमी असावे. कारण प्रमाणात भात जेवल्यास झोप येत नाही. शिवाय जितका जास्त भात खाल तितका पचनशक्तीवर जास्त ताण येईल. परिणामी झोप येण्याची शक्यता वाढेल. यासाठी दुपारच्या जेवणात पोळी- भाजी, भाकरी, डाळ, पराठा, दही, सलाड यांचा समावेश करा. मात्र भात अतिशय थोड्या प्रमाणात खा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Causes and remedies over sleep after eating rice in the afternoon.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL