14 December 2024 8:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

जेडीयू मतमोजणी स्पर्धेत शेवटी? | लढाई भाजप आणि आरजेडी दरम्यान?

Bihar Assembly Election 2020, JDU, Vote counting

पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार असून सध्या मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला महागठबंधनच्या बाजूने दिसणारे कल आता एनडीएच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणा ९ ते १० वाजल्यापासून निकालाचे कल हाती येणार आहेत. देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे २४३ जागांपैकी १६१ जागांचे कल हाती येताना दिसत आहेत. यात एनडीए ८१ जागांवर आघाडीवर आहे. यात भारतीय जनता पक्ष ४२, JDU ३४ विकसनशील इन्सान पार्टी ५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी ७५ जागांवर आघाडीवर आहे. यात राजदने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १३ व डावे ११ जागांवर आघाडीवर आहेत. बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. लोकजनशक्ती पक्ष दोन, एमआयएमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. पण आता भारतीय जनता पक्ष प्रणीत एनडीए आणि महाविकास आघाडीमधील अंतर बरचं कमी झालं आहे. एनडीए आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत सुरु आहे.

“लोकांनी जो कौल दिलाय, त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रीय जनता दल किंवा तेजस्वी यादव यांनी आमचा पराभव केलेला नाही पण करोना व्हायरसमुळे आम्ही पराभूत झालो आहोत” असे जनता दल युनायटेडचे प्रवक्ते के.सी.त्यागी एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले.

 

News English Summary: Nitish Kumar’s Janata Dal United party has conceded defeat in the Bihar Assembly polls. After the counting of votes began, the BJP led by Tejaswi Yadav had taken a big lead in many constituencies. But now the gap between the Bharatiya Janata Party-led NDA and the Mahavikas Aghadi has narrowed. The NDA and the Mahavikas Front are engaged in a fierce battle. We welcome the vote of the people. “We have not been defeated by Rashtriya Janata Dal or Tejaswi Yadav but we have been defeated by the corona virus,” Janata Dal United spokesperson KC Tyagi told NDTV.

News English Title: Bihar Assembly Election 2020 JDU too behind in vote counting news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x