6 May 2024 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड

CM Bhupendra Patel

गांधीनगर, १२ सप्टेंबर | भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाली आहे. पटेल यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. ही बैठक दुपारी 3 वाजता प्रदेश भाजपचे मुख्यालय कमलम येथे झाली होती. नवा नेता राज्यापालांना भेटणार आणि सरकार स्थापनेचा दावा करणार.

भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड – Bhupendra Patel is elected as a new Chief minister of Gujarat :

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांची निवड झाल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी रविवारी केली. भूपेंद्र पटेल यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आहे, असे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे गुजरात प्रभारी तोमर यांनी सांगितले. पटेल लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती देखील तोमर यांनी दिली.

कालच विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा दिला होता. त्यानंतर, भाजप मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला निवडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर आज पटेल यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली.

भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि जोशी यांना नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते. ते आज सकाळी गुजरातला आले आणि त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका घेतल्या होत्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Bhupendra Patel is elected as a new Chief minister of Gujarat.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x