6 May 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

मुंबईत २ ग्राम ड्रग्स पकडली तरी माध्यमं हंगामा करतात | गुजरातमध्ये ३ हजार KG ड्रग्स पकडल्यावर मीडिया शांत? - हार्दिक पटेल

Hardik Patel

गांधीनगर, २१ सप्टेंबर | गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो हेरॉईन पकडण्यात आली, ज्याची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.

मुंबईत २ ग्राम ड्रग्स पकडली तरी माध्यमं हंगामा करतात, गुजरातमध्ये ३ हजार KG ड्रग्स पकडल्यावर शांत? – Why Indian media is not talking 3 KG heroin seized in Gujarat asked Hardik Patel :

हसन हुसेन लिमिटेड:
फर्मकडे यातील मालाबद्दल चौकशी केली असता, ही टेलकम पावड असल्याचे सांगितले होते. दरम्यान, गुप्तचर विभागाला शंका आल्याने त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये हेरॉईन असल्याचे समोर आले. ही निर्यात करणारी फर्म अफगाणिस्तानच्या कंधार येथे ‘स्थित हसन हुसेन लिमिटेड’ म्हणून ओळखली जाते. (Heroin seized from Gujarat Mundra port)

डीआरआय आणि कस्टमचे ऑपरेशन गेल्या पाच दिवसांपासून सुरू होते. ही कारवाई झाल्यानंतर अधिकार्‍यांनी पुढील तपासणीसाठी माल पाठवल्याची माहिती आहे. तसेच, मुंद्रा बंदराव्यतिरिक्त गांधीधाम, मांडवी, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नईसह 5 इतर शहरांचा तपास करण्यात आला. या तपासात टेलकम पावडरच्या स्वरुपात करोडो किमतीची औषधे आयात केली जात असल्याची माहिती शोध यंत्रणेच्या लक्षात आली आहे.

दरम्यान, याच विषयावरून काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘मुंबई फिल्मसिटीमध्ये 2 ग्रॅम ड्रग्ज पकडली गेल्यावर मीडियाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. पण आता 3 हजार किलो ड्रग्ज गुजरातमध्ये पकडले गेले, यावर मीडियामध्ये कोणतीही चर्चा किंवा डिबेट होताना दिसत नाहीत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Why Indian media is not talking 3 KG heroin seized in Gujarat asked Hardik Patel.

हॅशटॅग्स

#Hardik Patel(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x