2 May 2024 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

सामान्य लोकांना रडवणार? | 1 हजार रुपयांपर्यत जाऊ शकते घरगुती LPG सिलिंडर किंमत | अनुदानही बंद करण्याच्या तयारीत

LPG cylinder price

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर | देशातील वाढत्या महागाईचा सामान्य माणसाला आणखी एक धक्का बसू शकतो. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, येत्या काळात ग्राहकांना प्रति एलपीजी सिलिंडर 1000 रुपये मोजावे लागू शकतात. तर दुसरीकडे, केंद्र सरकार एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे. तथापि, अजून अशी कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. मात्र, ग्राहक सिलिंडरसाठी एक हजार रुपयांपर्यंत पैसे देण्यास तयार आहेत, असे सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनातून समोर आले आहे. यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सामान्य लोकांना रडवणार?, 1 हजार रुपयांपर्यत जाऊ शकते घरगुती LPG सिलिंडर किंमत, अनुदानही बंद करण्याच्या तयारीत – LPG cylinder price may reach to one thousand rupees as per report :

मीडिया रिपोर्टनुसार, एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार दोन भूमिका घेऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे सध्या जसे चालू आहे, तसे चालू देणे. दुसरे म्हणजे, उज्ज्वला योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्राहकांनाच अनुदान दिले पाहिजे. मात्र, सध्यातरी सरकारकडून सबसिडी देण्याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितले गेले नाही.

1 वर्षात 6 पटीने कमी झाला सरकारवरील अनुदानाचा भार:
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये 3,559 कोटी रुपये ग्राहकांना सबसिडी म्हणून दिले होते. तर 2019-2020 या आर्थिक वर्षात हा खर्च 24,468 कोटी रुपये होता. म्हणजेच एका वर्षातच सरकारने सबसिडीमध्ये सुमारे 6 पट कपात केली आहे. यामुळे सरकारवरील अनुदानाचा भार एका वर्षात 6 पटीने कमी झाला आहे.

अनुदानासंदर्भात आता काय नियम आहेत?
सध्याच्या नियमांनुसार, जर तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ घेता येणार नाही. या व्यतिरिक्त, मे 2020 मध्ये काही ठिकाणी एलपीजीवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

यावर्षी 190.50 रुपयांनी महाग झाले गॅस सिलिंडर:
दिल्लीत या वर्षी 1 जानेवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. परंतु, आता एका सिलेंडरची किंमत 884.50 रुपये आहे. म्हणजेच जानेवारीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 190.50 रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गॅस सिलिंडरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतातील सुमारे 29 कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. यामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी एलपीजी कनेक्शनचा समावेश आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: LPG cylinder price may reach to one thousand rupees as per report.

हॅशटॅग्स

#LPG(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x