30 April 2024 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केली आहे | १०० अजित पवार भाजपला कसे झेपणार? - संजय राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, २६ सप्टेंबर | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आघाडी सरकारवर सातत्याने टीका करताना दिसते. मात्र गेल्या काही दिवसांपासून यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच रंगल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर सतत विविध आरोप करताना दिसत आहेत. चंद्रकांत पाटील देखील सातत्याने आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या सदरातून विरोधीपक्षाचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा ही लोकशाहीची धोक्याची घंटा ठरत आहे असा टोला देशील राऊतांनी लगावला आहे.

Shivsena MP Sanjay Raut mocks BJP leader Chandrakant Patil statement on deputy CM Ajit Pawar :

शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?
‘चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस फिरतात. हे विधान गमतीचेच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तिथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार? पण चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवलेच असेल तर त्यांना कोण थांबवणार? असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

सोमय्यांचे दौरे रोखू नये
‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असं मला वाटतं.’ असेही राऊत म्हणाले.

विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केली आहे
‘राजकारण्यांकडून विविध पातळ्यांवर मनोरंजन होतच असते. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केली आहे. किरीट सोमय्यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडेच ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. पण आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे हास्यजत्रा म्हणून पाहिले जात नव्हते,’

भूमिका कमी व जळफळाटच जास्त
‘ईडीच्या नावाने धमक्या द्यायच्या व चिखलफेक करायची हेच त्यांचे काम. सार्वजनीक जीवनात वावरणाऱ्या लोकांनी टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावे लागते. सामनातील अग्रलेखावर चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली व एक खरमरीत पत्र सामनास पाठवले. त्यात भूमिका कमी व जळफळाटच जास्त. त्या पत्रात चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी अपमानकारक, अब्रुनुकसानी करणारी विधाने करुनही ते प्रसिद्ध करण्याचे मोठेपण सामनाने दाखवले. पण लिहताना, बोलताना भान सुटले की स्वतःच्याच धोतरात पाय कसे अडकून पडतात ते या पत्रावरुन दिसते’ असे म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या पत्रावर थेट उत्तर दिले आहे.

महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का?
‘करोनाचा कहर आणि लॉकडाउनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लोक राजकीय बातम्यांमधून स्वत:चं मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली तर महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असं वाटतं. सर्वत्रच विनोद आणि रहस्यमय असं मनोरंजन सुरू आहे’ असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Shivsena MP Sanjay Raut criticize BJP state president Chandrakant Patil and Kirit Somaiya.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x