22 October 2021 12:40 PM
अँप डाउनलोड

फेकावं तर भाजपनेच | उत्तर प्रदेशच्या विकासाच्या जाहिरातीत प. बंगालचे रस्ते आणि फ्लाय-ओव्हर

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ , १२ सप्टेंबर | देशात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ अगदी काही महिन्यावर येऊन पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही तयारीला लागले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे उध्दभवलेल्या आणि गंगा घाटातील वास्तवामुळे योगी सरकारची जगभर पोलखोल झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच उत्तर प्रदेशात कोरोनामुळे स्थिती अत्यंत भीषण असल्याचं देखील देशाने अनुभवलं आहे. परिणामी योगी सरकारसाठी आगामी निवडणुका कठीण झाल्याचं म्हटलं जातंय.

BhagyaVivah Marathi Matrimonial

फेकावं तर भाजपनेच, उत्तर प्रदेशच्या विकासाच्या जाहिरातीत प. बंगालचे रस्ते आणि फ्लाय-ओव्हर – Uttar Pradesh Assembly Election 2022 transforming promotion advertisement used West Bengal Flyover pictures :

त्यात राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवणुकीतही भाजपाला जोरदार धक्का मिळाल्याचं पाहायला मिळालं. अगदी वाराणसी, मथुरा आणि अयोध्येतही भाजपाला धक्का मिळताना विरोधकांनी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सतर्क झालेल्या भाजपच्या योगी सरकारने विकासाचे धिंडोरे पिटण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यातही गोंधळल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

कारण, ज्या भाजपने काही महिन्यापूर्वी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी बंगालचे अतोनात नुकसान केल्याचं म्हटलं त्याच बंगालमधील रस्ते आणि फ्लाय-ओव्हर सध्या योगी सरकार स्वतःच्या जाहिरातीत झळकवत आहेत. विशेष म्हणजे फॅक्ट-चेक मध्ये ही पोलखोल झाली असून अनेक पत्रकारांनीही योगी सरकारच्या फसव्या जाहिराती स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 transforming promotion advertisement used West Bengal Flyover pictures.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x