28 April 2024 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
x

सोमय्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुबंई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा - राजू शेट्टी

Raju Shetti

कोल्हापूर, २६ सप्टेंबर | नुकताच किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते आणि ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर अनिल परब यांनादेखील ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात सोमय्या यांनी ट्वीट देखील केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणतात की, “किरीट सोमय्या यांच्या मध्ये जर हिंमत असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही त्यांनी बाहेर काढावा” असे त्यांनी आव्हान दिले आहे.

Former MP Raju Shetti challenges BJP leader Kirti Somaiya to expose corruption in Mumbai bank :

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकारी खात्याने सध्या दिले आहे. भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या बँकेचे अध्यक्ष आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, महापूर येऊन दोन महिने झाले आहेत. अजूनही शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना सरकारची हवी तशी मदत मिळाली नाहीये. लवकरात लवकर ही मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. जर ही मदत वेळेत मिळाली नाही तर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवावी, असा देखील इशारा त्यांनी दिला आहे.

राजकीय वर्तुळात होणाऱ्या सध्याच्या घडामोडींवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही साखर कारखान्यांमधील गैर व्यवहार बाहेर काढताना कोणता प्रांत, पक्ष असा भेदभाव केला नाही. देशातील सर्व राज्यातील साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढला. सोमय्या मात्र विशिष्ट पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मागे लागले आहेत. विशिष्ट नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Raju Shetti challenges BJP leader Kirti Somaiya to expose corruption in Mumbai bank.

हॅशटॅग्स

#RajuShetti(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x