मुंबई : देशभरात अनेक मुद्यांवरून भाजप विरोधी वातावरण असताना सुद्धा भाजप कस काय विजयी होत आहे, यावरून विरोधकांनी ईव्हीएम मशीन मधील तांत्रिक बाजू पुढे करत निवडणूक आयोगापर्यंत भेटीगाठी करून ईव्हीएम’ला तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन तसेच बॅलेटपेपरचा उपयोग करावा, अशी विनंती केली होती.

परंतु ईव्हीएम’ला विरोध दर्शविणारा विषय आता थेट नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दरबारी पोहोचला आहे. कारण पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि कट्टर राज ठाकरे समर्थक तुलसी जोशी या महाराष्ट्र सैनिकाने एका व्यंगचित्राच्या माध्यमातून लालबागच्या राजाच्या चरणी ईव्हीएम मशीनला जस इतर प्रगत देशांनी हद्दपार केलं आहे, तसं भारतातून सुद्धा ईव्हीएम मशीन’ला हद्दपार करून निवडणुकीत बॅलेटपेपरने मतदान प्रक्रिया सुरु करावी, असा व्यंगचित्राच्या माध्यमातून नवस केला आहे.

काय म्हटलं आहे त्या व्यंगचित्रात नेमकं?

“गणतंत्रला वाचवा, ईव्हीएम’ला हटवा” हेच लालबागच्या राजाच्या चरणी साकडं.

EVM Machine opposed by MNS workers and expressed it through caricature at Lalbaughcha Raja