2 May 2024 2:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

LPG Gas Cylinder | मोदी है तो मुमकिन है | गृहिणींनो, गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता

LPG cylinder price

मुंबई, ३० सप्टेंबर | एलपीजीच्या वाढलेल्या किंमतीने आधीच गृहीणींचे बजेट बिघडलेले आहे. अशावेळी घरगुती वापराच्या गॅसचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर १५ दिवसांनी २५-५० रुपयांची वाढ होत आहे. गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) महाग होत चालले आहेत. यात आता चीनमधील संकटाची भर पडली आहे.

LPG Gas Cylinder prices are likely to rise in India. At present, the price of a 14 kg domestic gas cylinder in Pune is around Rs 908.4. The price of a commercial 19 kg gas cylinder is Rs 1,715.5 :

चीनमध्ये कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे चीन सरकारने मिळेल तिथून नैसर्गिक गॅस आयात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात मोठी वाढ होत आहे, असे सांगितले जात आहे. यामुळे भारतात देखील गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यात १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर हा 908.4 रुपयांच्या आसपास आहे. तर व्यावसायीक १९ किलोच्या गॅस सिलिंडरचा दर हा 1715.5 रुपये आहे. १ सप्टेंबरला शेवटची दरवाढ झाली होती. सप्टेंबर २०२० मध्ये हाच गॅस सिलिंडरचा दर 596 रुपये होता. गेल्या वर्षभरात यामध्ये ३०० रुपयांची वाढ झाली आहे. सबसिडीही मिळत नसल्याने गृहीणींचे गणित बिघडले आहे.

देशातील शहरात मध्यम आणि गरीब रेषेखाली अनेक कुटुंबे राहतात. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी लाकडांवर जळणाऱ्या चुली वापरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या शहरी लोकांकडे महागडा गॅस सिलिंडर घेण्यापासून पर्याय राहिलेला नाही. घरगुती वापराच्या गॅस आणि सीएनजीमध्ये येत्या काळात १० ते २० टक्के दरवाढ होण्य़ाची शक्यता आहे. खासगी कंपन्यांकडून गॅस घेण्यासाठी सरकार सहा महिन्यांनी आढावा बैठक घेते, ती १ ऑक्टोबरला होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: LPG Gas cylinder price will increase soon report says.

हॅशटॅग्स

#Gas cylinder(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x