27 April 2024 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Parambir Singh | परमबीर सिंग बेपत्ता की आरोप करून देश सोडायला सांगितले? | युरोपातील देशात पळाल्याचा संशय

Parambir Singh

मुंबई, ३० सप्टेंबर | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) सापडत नाहीत. त्यामुळे ते गायब झालेत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर ते युरोपातील देशात पळून गेले असतील, असा संशयही तपास यंत्रणांकडून लावला जात आहे. कारण, चांदीवाल कमिशनने जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटनंतर पोलिसांनी सिंग यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराष्ट्र पोलिसांना परमबीर सिंग कुठे आहेत हे अजूनही शोधता आलेलं नाही.

Former Mumbai Police Commissioner Parambir Singh is missing. So did they disappear? This question is present. Investigators also suspect that he may have fled to a European country :

दुसरी शंका:
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लेटरबॉम्ब द्वारे धक्कादायक आरोप करण्यापूर्वी ते कुणाच्या तरी संपर्कात आणि मार्गदर्शनाखाली होते असा देखील संशय व्यत केला जातं आहे. आपली बदली होणार हे देखील त्यांना ठाऊक होते आणि त्याप्रमाणे ते झाले. मात्र त्यानंतर ते थेट चंदीगडला पळाले आणि तिथून त्यांना देश सोडण्यासाठी सांगितलं गेल्याचा संशय व्यक्त होतं आहे. परंतु, जर ते विदेशात पळाले असतील तर त्यांच्यावरच संशय अधिक वाढण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही खात्रीलायक आणि अधिकृत बातमी प्रसिद्ध झालेली नाही.

दुसरीकडे अनिल देशमुख प्रकरणी राज्य गृह विभागाच्या उपसचिवाला ईडीची नोटीस आल्याचं वृत्त आहे. अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री असताना गृह विभागातील कैलास गायकवाड हे या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यावर गृह व पोलीस विभागातील प्रशासकीय व्यवस्थापन, पोस्टिंग, ट्रान्स्फरची महत्वाची जबाबदारी सांभाळत होते. गृह विभागातील कथित पोस्टिंग, ट्रान्सफर प्रकरणात कैलास गायकवाड यांनी नेमकी कोणती भूमिका बजावली? याची चौकशी करण्यासाठी ईडीने नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे बार मालकांकडून 100 कोटी रुपये वसूल करून देण्यात आल्याचा आरोप माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टींगसाठी देशमुख यांना पैसे देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी ईडीकडून सुरू आहे. याच दरम्यान उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेली गाडी ठेवणे व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने ताब्यात घेतले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Parambir Singh is missing after allegations on Anil Deshmukh.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x