15 December 2024 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

खोट्या डिग्रीने पीएम बना | खऱ्या डिग्रीने भज्या तळा - प्रशांत भूषण

Senor advocate Prashant Bhushan, Modi govt, Unemployment

नवी दिल्ली, ०३ मार्च: देशावर कित्येक वर्षांपासून बेरोजगारीचे संकट ओढवलेले आहे. सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याच्या घोषणा करतं पण प्रत्यक्षात मात्र असं काही होत नाही. बेरोजगारी कोणत्या थराला जाऊन पोहोचली आहे, त्याच जिवंत उदाहरण हरियाणा राज्यातील पानीपतमध्ये वास्तव दाखवणारं उदाहरण समोर आलं होतं.

पानीपतमधील न्यायालयातील गट क वर्गातील १३ शिपाई पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी पात्रता फक्त आठवी पास ठेवण्यात आली होती. मात्र १३ जागांसाठी चक्क २७ हजार ६७१ उमेदवारांनी अर्ज केले होते. हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा, बीटेक अशा पदवीचे शिक्षण घेतलेल्या तरूण तरूणींनी अर्ज केले होते. भरतीच्या दिवशी सर्व उच्च शिक्षित तरूणतरुणी न्यायालयाच्या मैदानावर उपस्थित होते.

आधीच जागतिक स्तरावरील नोकऱ्यांची कमतरता असताना आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे म्हणजे तंत्रज्ञानाच्या ऑटोमेशनमुळे रोजगारांवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. कारण याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात, असा अहवाल एका जग विख्यात संस्थेने प्रसिद्ध केला आहे. दुसरीकडे मोदी सरकार यावर शांत असल्याचं पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला समाज माध्यमांवर #ModiRojgarDo जोर धरत आहे.

सुशिक्षित वर्गाची बेरोजगारीमुळे झालेली अवस्था पाहून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी पंतप्रधान मोदी यांना नाव न घेता टोला लगावला आहे. याबाबत ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “खोट्या डिग्रीने पीएम बना….खऱ्या डिग्रीने भज्या तळा आणि त्यासोबत एका आंदोलनाचा फोटो देखील ट्विट केला आहे.

 

News English Summary: The country has been facing an unemployment crisis for many years. The government announces employment for the unemployed but in reality this is not happening. The same living example of the level of unemployment has come to light in Panipat in the state of Haryana.

News English Title: Senor advocate Prashant Bhushan slams Modi govt over increasing unemployment news updates.

हॅशटॅग्स

#PrashantBhushan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x