9 May 2024 5:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Parambir Singh Missing? | परमबीर सिंग भारत सोडून पळाले असतील तर त्यात निश्चितच भाजपची भूमिका असणार - काँग्रेस

Parambir Singh Missing

मुंबई, ०१ ऑक्टोबर | एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

If Parambir Singh has fled India then there has to be a definite role of BJP in giving a safe passage to him Quite clear that saving Parambir Singh supports agenda of BJP said Sachin Sawant :

काही वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या नॉट रिचेबल असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग त्यांना पहिले समन्स देण्याअगोदरच देशाबाहेर पळाले आहेत. सिंग हे चंदीदडमधून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळून गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

अजून ठोस माहिती नाही:
गृहमंत्रीगेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग हे नॉट रिचेबल असून ते कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. परमबीर सिंग यांच्या देशाबाहेर पलायनाच्या बातम्यांवर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांमधून अशी माहिती समोर येत असल्याचे म्हटले आहे. याविषयी अजून ठोस माहिती मिळाली नाही असे वळसे पाटील म्हणाले. पोलीस परमबीर सिंग यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने रजेवर असताना आपण कुठे आहोत हे कळविणे गरजेचे असते. मात्र सिंग यांनी याबाबतीत काही कळविलेले नाही असे पाटील म्हणाले. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

परवानगीशिवाय ते बाहेर जाऊ शकत नाहीत:
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय गृह मंत्रालयासोबतच आम्ही देखील परमबीर सिंह यांना शोधत आहोत. मी ऐकलं की ते भारताबाहेर गेले आहेत. पण एक सरकारी अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत”, असं वळसे पाटील म्हणाले. परमबीर सिंह रशियात असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर गृहमंत्री बोलत होते.

परमबीर सिंह यांच्या विरोधात लुक आउट परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार सिंह यांचा शोध घेत आहे. यासाठी, ठिकाणे शोधली जात आहेत आणि पुढील कारवाईविषयी केंद्राशी चर्चा केली जाणार आहे.

याच विषयाला अनुसरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लक्ष करताना सडकून टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “जर परमबीरसिंह भारत सोडून पळून गेले असतील तर त्यांना सुरक्षित मार्ग देण्यात भाजपची निश्चित भूमिका असणार. हे स्पष्ट आहे की परमबीर सिंह यांना वाचवणे हा भाजपाच्या अजेंड्याचा भाग आहे. हे लक्षात घ्यावं लागेल की सर्वात आधी NIA अँटिलिया प्रकरणाची चौकशी करत होती. एनआयएच्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे, ‘वाझे परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते, ज्याने आता जर परमबीर पळून गेले असतील तर ते एनआयएचे अपयश आहे. चौकीदार सरकार काय करत होते? नीरव मोदी, चोक्सी, मल्ल्या आणि परमबीर सारखे लोक देश सोडून पळून जातात तेव्हा चौकीदार सरकारला झोपा काढत असतात का?

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Parambir Singh Missing congress spokesperson target BJP with serious allegations.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x