28 April 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

NCB Cruise Raided | NCB'चं पुराव्यानिशी भांडं फुटलं | समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्यासाठी मागणी

NCB Cruise Raided

मुंबई, 0९ ऑक्टोबर | ड्रग्ज क्रुझ प्रकरणावर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, ज्यादिवशी क्रुझवर छापेमारी (NCB Cruise Raided) करण्यात आली, त्यादिवशी समीर वानखेडेने माध्यमांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी 8-10 लोकांना पकडल्याचे सांगितले. मात्र, हे खोटे आहे. त्यात 11 जण होते.

NCB Cruise Raided. Three people have been released. Minister Nawab Malik claims that Shrishabh Sachdeva, Pratik Gaba and Aamir Furniturewala have been released :

मुंबई पोलिसांजवळ सकाळपर्यंत पूर्ण माहिती होती. यानंतर बातम्या आल्या की, 8 लोकांनाच पकडण्यात आले. त्यात तीन जणांना सोडण्यात आले आहे. श्रृषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमीर फर्निचरवाला या तीन लोकांना सोडण्यात आल्याचा दावा मंत्री नवाब मलिकांनी केला. श्रृषभ सचदेवा हे भाजपच्या युवा मोर्चाचे मोहित कंबोज यांचे नातेवाईक आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. श्रृषभ सचदेवाला पकडल्यानंतर त्यांना दोन तासात सोडण्यात आले. सोडण्यात आले त्यावेळी त्याचे वडीलही सोबत होते. जेव्हा सुनावणी होत होती, त्यावेळी कोर्टात यांचे नाव आले आहे. 1300 लोकांच्या जहाजावर छापा टाकण्यात आला. 12 तास हा छापा चालला. त्यात फक्त तुम्ही 11 लोकांना पकडले. यानंतर सर्वांना एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणले. मात्र, यातील तीन जणांना सोडण्यासाठी एनसीबीला कोणी आदेश दिला? याचा खुलासा समीर वानखेडेंनी करावा, अशी मागणी त्यांनी केली.

या तिघांना याठिकाणी का आणले, का सोडण्यात आले, याची माहिती द्यावी. समीर वानखेडेची कॉल रेकॉर्ड्स काढण्यात यावे. समीर वानखेडे यांचे भाजपच्या दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील नेत्यांसोबत संभाषण झाले आहे. याचा तपास व्हावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCB Cruise Raided why released Shrishabh Sachdeva Pratik Gaba Aamir Furniturewala.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x