10 May 2025 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

२००९ मध्ये काँग्रेसच्या काळात कामाला सुरुवात झालेल्या सिक्कीमच्या पहिल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण

सिक्कीम : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सकाळीच राज्यातील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. परंतु, आज मोदींच्या हस्ते उदघाटन झालं असल तरी या विमानतळाचं काम २००९ मध्येच म्हणजे काँग्रेसच्या राजवटीचा सुरु झालं होत. पूर्वनियोजित योजनेनुसार या विमानतळाचं बांधकाम पूर्ण होण्यास तब्बल ९ वर्षांचा कालावधी लागला. सिक्कीममधील पहिलं विमानतळ राजधानी गंगटोकपासून ३३ किलोमीटर अंतरावर आहे. हे विमानतळ तब्बल २०१ एकरवर पसरलेलं आहे. समुद्रसपाटीपासून ४,५०० फूटांवर पाकयोंग गावापासून २ किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे महत्वाकांक्षी विमानतळ उभारण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू सुद्धा उपस्थित होते. या उदघाटन कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी कालच गंगटोकमध्ये दाखल झाले होते. रविवारी संध्याकाळी ते सिक्किमला दाखल झाले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान, राज्यपाल गंगा प्रसाद आणि मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. या नव्या पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. एएआयनं या भव्य विमानतळाची उभारणी केली आहे. या विमान तळाच भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे असं तज्ज्ञ सांगतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या