Daily Horoscope | 17 ऑक्टोंबर 2021 | राशीनुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस

मुंबई, 16 ऑक्टोबर | 17 ऑक्टोंबर 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे (Daily Horoscope) तुमचे राशीभविष्य.
Daily Horoscope. What will be your financial status on 17th October 2021 and what will be the luck of the people in which zodiac sign? So know that Sunday is your horoscope for today :
मेष:
या राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.
शुभ उपाय- शंकराची पूजा करा.
शुभ दान- अन्नदान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- केशरी
वृषभ:
आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.
शुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.
शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- गुलाबी
मिथुन:
मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.
शुभ उपाय- गाईला चारा द्या.
शुभ दान- तांदूळ दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- पांढरा
कर्क:
परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.
शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.
शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- करडा
सिंह:
आज या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.
शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.
शुभ दान- रक्तदान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- गुलाबी
कन्या:
कन्या राशीतील व्यक्तींनी आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.
शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.
शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.
शुभ अंक- 3
शुभ रंग- क्रिम कलर
तुळ:
तुळ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.
शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.
शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पिवळा
वृश्चिक:
या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.
शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.
शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- आकाशी
धनु:
धनु राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.
शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.
शुभ दान- गाईंना चारा द्या.
शुभ अंक- 6
शुभ रंग- जांभळा
मकर:
आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.
शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.
शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पोपटी
कुंभ:
आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.
शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.
शुभ दान- अन्न दान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- जांभळा
मीन:
आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.
शुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- निळ
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: Daily Horoscope of 17 October 2021 astrology updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL