4 May 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

व्हिडिओ: मोदींच्या भाषणात गरीब, पण आज केवळ ८३१ श्रीमंतांकडे देशाचा २५% जीडीपी गेला: सविस्तर

नवी दिल्ली : सरकार बदललं तरी देशातील गरीब श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बार्कलेज हुरुन रिच लिस्टवरुन देशातील हे वास्तव समोर आलं आहे. मोदींच्या प्रत्येक भाषणात गरीब आणि गरिबी झळकते, परंतु जमिनीवरील वास्तव वेगळंच असल्याचं चित्र आहे. आधीच वाढत्या इंधन दरामुळे विकोपाला गेलेली महागाई आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या सामान्य माणसाची अवस्था फारच कठीण होऊन बसली आहे.

मोदी युगात सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असली, तरी देशातील संपत्ती निर्मितीचा वेग एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ ८३१ लोकांकडे असणाऱ्या संपत्तीचं मूल्य १ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. त्याचा थेट अर्थ असा की देशाचा एक चतुर्थांश जीडीपी फक्त ८३१ लोकांच्या खिशात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील ८३१ लोकांकडे असलेल्या संपत्तीचं मूल्य ७१९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं आहे. तर भारताचा जीडीपी २ हजार ८४८ कोटी आहे. त्यामुळे उपलब्ध टक्केवारी विचारात घेतल्यास, देशातील केवळ ८३१ लोकांकडे देशाचा तब्बल २५ टक्के जीडीपी असल्याचं बार्कलेज हुरुनचा अहवाल सिद्ध करतो.

बार्कलेज हुरुन यांनी भारतातील श्रीमंतांची यादीदेखील प्रसिद्ध केली आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २१४ नव्या श्रीमंतांचा समावेश झाला आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या यादीत सलग ७व्या वर्षी पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. नव्या श्रीमंतांमध्ये ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचा समावेश झाला आहे. चोवीस वर्षीय रितेश अग्रवाल यांच्या ओयो कंपनीचं सध्याचं बाजारमूल्य ५ बिलीयन अमेरिकन डॉलर इतकं झालं आहे आणि ते देशातील सर्वात तरुण उद्योगपती आहेत. भारतातील ८३१ व्यक्तींचा समावेश बार्कलेज हुरुनच्या यादीत आहे. त्यात विशेष बाब म्हणजे यामध्ये ११३ व्यक्ती या पहिल्या पिढीतील उद्योगपती आहेत. या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा समावेश आधी बार्कलेज हुरुनच्या यादीत झालेला नाही, नाहीतर हा आकडा कितीतरी मोठा झाला असता.

देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं योग्य वेळी योग्य नियोजन न झाल्यास भविष्यातील अडचणी वाढून देशात आर्थिक अराजक माजेल अशी भीती अनेक वर्ष आधीच जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्री आणि नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अमर्त्य सेन यांनी व्यक्त केली होती. त्यांनी व्यक्त केलेली ती भीती दिवसेंदिवस ठळक होताना दिसत आहे. भविष्यात देशाचं अर्थकारण केवळ ठराविक उद्योगपतींच्या हाती जाऊन गरीब आणि साम्यान माणूस त्या भांडवलदारांच्या आर्थिक गुलामगिरीत ढकलला गेल्यास नवल वाटायला नको.

व्हिडिओ : गरीब – गरिबी आणि कुशल कामगारांवर भाषणं देणारे मोदी आणि त्यांच्या राजवटीतील वास्तव

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x