2 May 2025 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शेतकऱ्यांनो! | तलाठी कार्यालयात हेलपाटे न मारता मिळवा शेतजमिनीचा असा ऑनलाईन 'डिजिटल 8-अ'

Digital 8A

मुंबई, ०५ जून | डिजिटल 8अ (Digital 8A ) म्हणजे वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असतो. तसेच अनेक योजनांसाठी हे कागदपत्र आवश्यक असते. 8अ काढण्यासाठी अनेकदा तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत असत, मात्र आता डिजिटल 8अ मुळे आपणास घरबसल्या देखील हा दाखला मिळणार आहे, तो कसा काढावा याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात,

डिजिटल 8अ काढण्यासाठी प्रथम आपल्याला पुढील लिंक वर क्लिक करा. https://bhulekh.mahabhumi.gov.in/

‘न्यू यूजर रजिस्ट्रेशन’ (‘New user registration’) करण्याकरिता काय करावे?

  1. जर तुम्ही प्रथमच ह्या वेबसाईटवर आला असाल यापूर्वी तुम्ही याचा लाभ घेतला नसेल तर प्रथम तुम्हाला ‘न्यू यूजर रजिस्ट्रेशन’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  2. या पर्यायावर क्लिक केल्यावर तिथे एक फॉर्म दिसेल
  3. या फॉर्म मध्ये तुमची वैयक्तिक माहिती संपूर्ण नाव भरायचे आहे. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर द्या. अशी माहिती लिहा.
  4. त्यानंतर Occupation म्हणजे तुमचा व्यवसाय उदाहरणार्थ शेती, व्यवसायिक, म्हणजेच तुम्ही काय करता, या पर्यायांची माहिती द्या.
  5. यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारखेचा रकाना भरा माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयी संपूर्ण व्यवस्थित माहिती भरा यामध्ये घर क्रमांक, गावाकडे राहात असाल तर ग्राउंड फ्लोअर, घरावर काही नाव असेल तर ते टाका.
  6. त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचे नाव आपोआप फॉर्मवर येईल.
  7. त्यापुढे गल्लीचे नाव, गावाचे नाव, City तालुक्‍याचे नाव टाका. अशी संपूर्ण माहिती व्यवस्थित लिहा
  8. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग आयडी तयार करायचा आहे.
  9. लॉग-इन आयडी टाकला की त्यानंतर Check availability या पर्यायावर क्‍लिक करून तो आयडी अगोदरच अस्तित्वात आहे की नाही ते पाहा. तो जर नसेल तर त्यानंतर पासवर्ड टाका. त्यानंतर येथे दिलेल्या चार-पाच सोप्या प्रश्‍नांपैकी एकाचे उत्तर द्या.
  10. त्यानंतर कॅप्टचा टाईप करायचा आहे. Captcha समोर दिसणारा कॅपच्या आहे तसा बरोबर लिहा.
  11. शेवटी सबमिट बटण दाबा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन कम्प्लिट असा मेसेज येईल तेव्हा “क्‍लिक हिअर या पर्यायावर क्‍लिक करा. रजिस्ट्रेशन करताना टाकलेले यूजर नेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.
  12. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर “Digitally Signed 8-A” हा दुसरा पर्याय तुम्ही पाहू शकता. या पर्यायावर क्‍लिक केलं की “डिजिटल स्वाक्षरीत 8-अ’ असे शीर्षक असलेले पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  13. जर तुम्ही यापूर्वी या वेबसाईटला भेट दिली असेल, म्हणजे सातबारा वगैरे काढला असेल जर तुमच्याकडे जुना लॉगिन आयडी असेल तर तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता.
  14. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला उजवीकडे Digitally Signed 7/12 किंवा डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी या पर्यायावर क्‍लिक करा.
  15. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे नवीन पेज ओपन होईल,येथे डिजिटल स्वाक्षरीतला सातबारा, 8-अ आणि प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता.
  16. वेबसाईटवर नोंदणी केली असेल, म्हणजे या अगोदर सातबारा उतारा काढला असेल तर लॉगइन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील इतर सेवांचा लाभ घेऊ शकता.

डिजिटल 8अ चा फायदा अनेक योजनांसाठी होतो:
याचाच अर्थ पीक कर्ज, पीक विमा आणि इतर अनेक शेतीसंबंधीच्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी डिजिटल सातबारा उतारा आणि 8-अ खाते उतारा अधिकृतपणे वापरू शकतात.

 

News English Summary: Digital 8A (Digital 8A) is a collection of farmland information of many farmers divided into different group numbers. This document is also required for many schemes. To get 8A, you often had to go to the Talathi office, but now with digital 8A, you can get this certificate even if you are at home, let’s know all the information on how to get it.

News English Title: Online Digital 8A for farmers easy steps to get it easily from Mahabhumi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या