3 May 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

फडणवीसांचे वादळी दौरे | 4 ठिकाणी १२- १५ मिनिटांच्या बैठका | केंद्राच्या आयुष्मान आरोग्य केंद्राचे पत्रे उडाल्याचे पाहिले अन...

Tauktae cyclone

रत्नागिरी, २० मे | तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता राजकीय दौरे सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात आघाडी घेतली असून सरकार विचारात असतानाच त्यांनी बुधवारी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. अलिबागसह ६० किलोमीटर अंतरातील ३ गावांत अवघ्या अडीच तासात त्यांनी चार ठिकाणी भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी फार तर ८ ते १३ मिनिटे वेळ दिला. यामुळे फडणवीस यांचा दौरा “चक्रीवादळ पर्यटन’ ठरले आहे. विरोधी पक्षनेता येणार म्हणून चारही ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. गर्दीमुळे कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाला. फिजिकल डिस्टन्सिगच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. दुपारी १२ वाजता मुंबईतील सागर निवासस्थानाहून कारने निघाल्यावर ते ३ वाजता रायगडला पोहचले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते.

१५ मिनिटांत बैठक गुंडाळली : वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस दुपारी ३:१० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अलिबाग, श्रीवर्धन, मसाळा आणि पोलादपूर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. अवघ्या १५ मिनिटांत बैठक संपवून ते कोळीवाडी परिसरातील बंदराची पाहणी करण्यासाठी पोहोचले. कोळी बांधवांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. १३ मिनिटे थांबून ते येथून पुढील प्रवासाला निघाले.

तीन गावांना भेटी आणि तेथे दिसले आयुष्मान भारतअंतर्गत बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे सलग दुसऱ्यांदा पत्रे उडालेले:
साधारण तासाभराचा प्रवास करत फडणवीस ४: ५८ वाजता उसर गावात पोहोचले. या ठिकाणी चक्रीवादळामुळे पाण्याची टाकी कोसळली होती. एका ग्रामस्थाने त्यांना नुकसानीची माहिती दिली. लगेच त्यांचा ताफा वावे गावाच्या दिशेने निघाला. एका घराचे पत्रे उडून गेले आहेत. त्याची पाहणी केली. येथे ५:०५ ते ५:१८ असे १३ मिनिटे ते थांबले. परत तासाभराचा प्रवास करत ६:१५ वाजता रोहा तालुक्यातील मेढा गावात पोहचले. येथे आयुष्मान भारतअंतर्गत बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे सलग दुसऱ्यांदा पत्रे उडाले आहेत. येथून त्यांचा ताफा महाडला मुक्कामी पोहोचला आणि कारण होतं एका टीव्ही वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन राज्य सरकर कसं चुकीचं आहे हे सांगायचं होतं आणि तसंच घडलं. यथे पोहोचल्यावर कोरोना आपत्ती हाताळण्यात राज्य सरकार कसं चुकलंय आणि मोदी सरकार किती महान काम करत आहे याचा पाढा त्यांनी वाचल्याचं पाहायला मिळालं. यावरून हा दौरा वादळाच्या नुकसान संबंधित आढाव्यासाठी होता की राज्य सरकारविरोधात टीका करण्यासाठी याचा प्रत्यय पुन्हा फडणवीसांनी दिला आहे.

 

News English Summary: Political tours have now begun to inspect the damage caused by the cyclone. Opposition leader Devendra Fadnavis took the lead and visited Raigad district on Wednesday while the government was considering. He visited four places in just two and a half hours in three villages within a distance of 60 km including Alibag.

News English Title: Devendra Fadnavis tour of Konkan after Tauktae cyclone news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x