20 April 2024 4:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Exit Poll | आरजेडी-काँग्रेस जोमात | तर जेडीयू-भाजपाची डोकेदुखी वाढणार

Bihar Assembly Election 2020, exit poll, RJD, BJP, JDU

पाटणा, ७ नोव्हेंबर: देशातील आणि उत्तर भारतातील महत्वाच्या बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्सिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक्सिट पोलनुसार आरजेडी आणि काँग्रेस आघाडी एनडीए’पेक्षा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) युतीची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

बिहारच्या 243 जागांच्या एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. नितीशकुमार यांना 37.7 टक्के मते मिळताना दिसत आहेत. लालूंच्या पक्षाला 36 टक्के मते मिळाली आहेत. जागांची चर्चा केल्यास नितीशकुमार यांच्या युतीला 104 ते 128 तर लालू आघाडीला 108 ते 131 जागा मिळू शकतात, चिराग पासवान यांना 1 ते 3 आणि इतरांना 4 ते 8 जागा मिळतील.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुक मतदानाच्या पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील एकूण ७१ मतदारसंघांचा समावेश होता. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. त्यानंतर पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांचा समावेश होता. या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबर रोजी पार पडलं आणि आज (शनिवारी) मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांत मतदान पार पडलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी निवडणूक आयोगानं मतदानासाठी घेतली होती. यासाठी नव्या गाईडलाईन्सही तयार करण्यात आल्या होत्या. दरम्यान, बिहार निवडणुकीत यंदा राज्यातील ७ कोटींहून अधिक मतदारांसाठी एक लाखांहून अधिक मतदार केंद्रांवर उभारण्यात आली होती.

 

News English Summary: Exit poll figures for 243 seats in Bihar are available. Nitish Kumar seems to be getting 37.7 per cent votes. Lalu’s party got 36 per cent votes. In terms of seats, Nitish Kumar’s alliance will get 104 to 128, Lalu Aghadi 108 to 131, Chirag Paswan 1 to 3 and others 4 to 8.

News English Title: Bihar Assembly Election 2020 exit poll news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x