2 May 2025 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

VIDEO | बिहारचं शिक्षण मंत्री पद | राष्ट्रगीत सुद्धा माहित नसलेल्या आमदाराची वर्णी

RJD Party tweets, old video, Education Minister Mewalal Choudhary, National anthem

पाटणा, १८ नोव्हेंबर: बिहारमध्ये निकालाअंती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचे नैतृत्व नितीश कुमार हेच मुख्यमंत्री म्हणून पुढील पाच वर्ष करतील हे देखील स्पष्ट झालं आहे. परंतु, या सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे, त्या मोवालाल चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीत देखील म्हणता येत नाही. यासंदर्भातील एक जुना व्हिडिओ आरजेडीने समाज माध्यमांवर शेअर केला होता.

दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी देखील तोचव्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत, या मंत्री मोहोदयांच्या ज्ञानाचा पार ‘पंचनामा’ केला आहे. बिहारमध्ये निकाल लागून एनडीएचे सरकार स्थापन होऊन अद्याप दोन दिवस देखील पूर्ण झाले नाहीत, तोच या सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकूण बिहारमधील शिक्षणमंत्र्यांच्या गुणवत्तेवरच बोट ठेवण्यात आलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात (Bihar Assembly Election) हाच व्हिडिओ राष्ट्रीय जनता दलाने देखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करून आरजेडीने नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारवर पहिला हल्ला चढवला होता. मेवालाल चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. असे आरोप असणाऱ्या मेवालाल चौधरी यांना राज्यचे शिक्षणमंत्री केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे.

 

News English Summary: In Bihar, a Bharatiya Janata Party-led NDA government has been formed. It has also become clear that Nitish Kumar will lead this government as the Chief Minister for the next five years. However, Mowalal Chaudhary, who has been cast as the Education Minister in this government, cannot even be called the national anthem of the country. An old video in this regard was shared by RJD on social media.

News English Title: RJD Party tweets old video of Mewalal Choudhary singing national anthem News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या