8 December 2021 5:47 PM
अँप डाउनलोड

Actress Pooja Sawant Biography | अभिनेत्री पूजा सावंत बद्दलची 'ही' माहिती जाणून घ्या

Actress Pooja Sawant Biography

मुंबई, २२ सप्टेंबर | मराठी चित्रपट सृष्टीतील एक चमकता चेहरा म्हटले कि अभिनेत्री पूजा सावंतचे नाव डोळ्यासमोर येते. २५ जानेवारी १९९० ला पूजाचा जन्म झाला. पूजा चे वडील विलास सावंत यांनी वयाची ३० वर्षे अभिनय क्षेत्रात काम केले आहे तर आई अमृता ह्या एक उत्तम गृहिणी आहेत. पूजाच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केले आहे. वडिलांकडूनच आपल्याला अभिनयाचा वारसा मिळाला असे पूजा नेहमी सांगते.

अभिनेत्री पूजा सावंत बद्दलची ‘ही’ माहिती जाणून घ्या – Actress Pooja Sawant Biography in Marathi :

पूजा सावंतचे शालेय शिक्षण हे दादरच्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ येथून झाले तर महाविद्यालयीन शिक्षण हे वडाळ्याच्या एम आय ई एस महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. पूजाला लहानपणापासूनच नृत्याची भयंकर आवड असल्याने शाळेत आणि महाविद्यालयात असताना तिने अनेक नृत्यस्पर्धा आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आणि अनेक बक्षिसे मिळवली. (Actress Pooja Sawant Biography)

Actress-Pooja-Sawant-information-in-Marathi

पूजाला लहानपणापासूनच प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते. पक्षी व प्राण्यांची प्रचंड आवड असल्याकारणाने तिने तिच्या घरीही अनेक प्राणी पाळले आहेत. २००८ साली पूजाने महाराष्ट्र टाइम्स च्या ‘श्रावण क्विन’ या स्पर्धेत भाग घेतला. त्यामध्ये आपल्या प्रखर अभिनय आणि नृत्यकौशल्याने तिने हि स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचा जज असलेल्या सचित पाटील याने पूजाचा अभिनय पाहून तिला आपल्या आगामी ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटासाठी विचारणा केली. पूजानेही लगेच होकार कळविला आणि अशा प्रकारे पूजा सावंत चे मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झाले.

त्यानंतर पूजा ने हिंदी रिऍलिटी शो ‘बुगी वूगी’ आणि मराठी टीव्ही शो ‘एकापेक्षा एक – जल्लोष सुवर्णयुगाचा’ या सारख्या शो मध्ये कधी आपल्या अभिनयाने तर कधी नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तिने ‘वाजले कि बारा’ या टीव्ही शोचे होस्टिंग पण केले. २०१० मध्ये हिंदी चित्रपट ‘तुम मिलो तो सही’ मध्येही एक छोटीशी भूमिका निभावली. त्यानंतर २०११ मध्ये अंकुश चौधरी सारख्या सुप्रसिद्ध मराठी कलाकारासोबत ‘झकास’ या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका निभावली. हा चित्रपट २०११ चा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

Actress-Pooja-Sawant-Biography-in-Marathi

त्यानंतर पूजा सावंतने ‘सतरंगी रे, सांगतो ऐका, नीलकंठ मास्तर, पोस्टर बॉईज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका निभावल्या. तसेच ‘नीलकंठ मास्तर’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी तिने नृत्यदिग्दर्शनही केलेले आहे. २०१५ साली पूजा ने चंद्रकांत कणसे यांच्या ‘दगडी चाळ’ या चित्रपटात पुन्हा एकदा अंकुश चौधरी सोबत काम केले. हा चित्रपटही प्रचंड गाजला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

Biography: Actress Pooja Sawant information in Marathi.

हॅशटॅग्स

#PoojaSawant(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x