26 September 2023 11:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

सुशांतच्या वकिलांना मुंबई पोलिसांचं महत्व पटलं? | CBI व बिहार पोलिसांबाबत वक्तव्य

Sushant Singh Rajput Case, CBI, Bihar Police, Mumbai Police

मुंबई, २८ सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय, एनसीबी आणि ईडीसारख्या राष्ट्रीय संस्था तपास करताना अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नाही, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर संशय घेतला, तिला अटक झाली असली तरी सुशांत प्रकरणाशी अजून खुलासा झाला नाही, सुशांत सिंह राजपूत प्रकरण आता सीबीआयसाठी प्राधान्य राहिलं नाही असा दावा सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांनी केला आहे.

सुशांत सिंह राजपूतचे वकील विकास सिंह म्हणाले की, आम्हाला सुरुवातीपासून सुशांत प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी जाऊ नये असं वाटत होतं, पण ज्यावेळी पटणा पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासात अडथळे आणण्यास सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. त्यानंतर आम्ही सीबीआय तपासाची मागणी केली. मात्र आता या प्रकरणाला सीबीआय प्राथमिकता देत नाही. सीबीआय टीम आणि एम्सची टीम एकाच शहरात असूनही अनेक दिवसांपासून एकमेकांना भेटली नाही. यामुळे हे स्पष्ट आहे सीबीआयसाठी सुशांत सिंह राजपूत प्रकरण प्राधान्याने घेण्यासारखे नाही असा आरोप त्यांनी केला. इंडिया टुडे यांनी याबाबत बातमी दिली आहे.

दरम्यान, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसंच, राज्यातील युवा मंत्र्याला वाटवण्यासाठी मुंबई पोलिस प्रयत्न करत असल्याचे आरोप सातत्याने होत होते. त्यानंतर, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, जवळपास दीड महिना होत आला तरी सीबीआयच्या हाती काहीच ठोस पुरावे आले नाहीत. यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय तपासाच्या निकालासाठी आम्हीही उत्सुक आहोत, असा टोला विरोधकांना लगावला आहे.

 

News English Summary: With many stars joining the drug probe which emerged out of the mysterious death of actor Sushant Singh Rajput, senior advocate Vikas Singh, representing the late actor’s family, on Friday (September 25) stated that the NCB probe is overshadowing and hindering the investigation behind the real truth in the death case. He also accused the Central Bureau of Investigation (CBI) of going slow in the case. In an NDPS case, everything depends on the quantity, the family feels it is being done to divert from the main issue (death case of sushant),” said Vikas Singh while holding a press conference here on Friday.

News English Title: Big revelation of family in Sushant case We did not want the CBI to investigate Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x