8 December 2021 7:31 PM
अँप डाउनलोड

ड्रग्ज प्रकरण | दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स

Narcotics Control Bureau, Summons, Deepika Padukone Sara Ali Khan Shraddha Kapoor and Rakul Preet Singh, Marathi News ABP Maza

मुंबई, २३ सप्टेंबर : ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसांत प्रत्येकाला जबाब नोंदवण्यासाठी हजेरी लावावी लागणार आहे. दीपिका पादुकोण मुंबईत नाही, त्यामुळे ती 25 सप्टेंबरला एनसीबीसमोर जबाब नोंदवू शकते. रकुल प्रीत सिंग आणि सायमन खंबाटा यांना उद्या एनसीबीसमोर हजर व्हावे लागेल. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान 26 सप्टेंबरला एनसीबीसमोर हजर होतील.

श्रुती मोदी, सिमॉन खंबाटा आणि रकुल प्रित सिंह यांना २४ सप्टेंबरला म्हणजे उद्याच चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. दीपिका पदुकोणला २५ सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना २६ सप्टेंबरला हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर जया साहा हिने अमली पदार्थविरोधी पथकाकडून (एनसीबी) होणाऱ्या चौकशीत मोठा खुलासा केला. अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली जयाने दिली. एनसीबीने चौकशीदरम्यान तिचे श्रद्धासोबतचे व्हॉट्स अ‍ॅप चॅट समोर दाखवले आणि सीबीडी ऑईलबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ते चॅट खरे असून श्रद्धा कपूरला सीबीडी ऑईल पुरवल्याची कबुली जयाने दिली. ‘इंडिया टुडे’नं हे वृत्त दिलं आहे.

 

News English Summary: The Narcotics Control Bureau (NCB) on Wednesday issued summons to actors Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha Kapoor and Rakul Preet Singh in a drug case related to the death of Sushant Singh Rajput. While Padukone has been asked summoned on September 25, Shraddha Kapoor and Sara Ali Khan have been asked to appear on September 26, news agency ANI reported.

News English Title: Narcotics Control Bureau on Wednesday issued summons to actors Deepika Padukone Sara Ali Khan Shraddha Kapoor and Rakul Preet Singh Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x