 
						Sarkari Yojana | सध्याच्या काळात नोकरी आणि व्यवसायापेक्षा व्यवसायाला जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. अगदी तरुणवर्ग देखील शिक्षणानंतर नोकरी नाही तर, व्यवसाय करण्याचा मार्ग निवडत आहेत. तुम्ही देखील स्टार्टअप करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याजवळ स्टार्टअपसाठी पुरेसे पैसे नसतील तर, चिंता करण्याची काहीही गरज नाही.
आता तुम्हाला सरकारकडून बिझनेस स्टार्टअपसाठी कर्ज मिळणार आहे. अनेकांना सरकारच्या कोणकोणत्या योजना व्यवसायासाठी लाखोंच्या घरात कर्ज प्रदान करतात हे ठाऊकच नाहीये. या बातमीपत्रातून आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आर्थिक रूपाने अस्थिर किंवा कमजोर असणाऱ्या व्यक्तींसाठी सरकार जास्त मदत करण्यास खंबीर आहे. चला तर जाणून घेऊया सरकारच्या नेमक्या कोणकोणत्या योजना आपल्याला बिझनेस सुरू करण्यासाठी लोन प्रदान करतात.
प्रधानमंत्री मुद्रा योजना :
2015 साली सुरू झालेली प्रधानमंत्री मुद्रा योजना अत्यंत कमालीची योजना आहे. या योजनेअंतर्गत लोन प्राप्त करून आतापर्यंत अनेक व्यक्तींनी स्वतःचा मोठा बिझनेस सुरू केला आहे. गैर-कार्पोरेट त्याचबरोबर कृषी व्यवसायांसाठी तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत अर्ज दिले जाते.
क्रेडिट गॅरंटी फंड योजना :
क्रेडिट गॅरंटी फंड योजना देखील अत्यंत फायद्याची ठरू शकते. क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्ग तुम्हाला मान्यताप्राप्त स्टार्टअप करण्यासाठी अगदी विना गॅरेंटी लोन दिले जाते. यामध्ये DPIIT त्याचबरोबर मान्यताप्राप्त स्टार्टअपसाठी राजस्व स्ट्रीमसह स्टार्टअप करण्यासाठी लोन दिले जाते.
स्टँड अप इंडिया योजना :
2016 साली सुरू झालेल्या स्टँड अप इंडिया योजनेमध्ये तुम्हाला 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत लोन दिले जाते. या योजनेअंतर्गत SC आणि ST कॅटेगिरी महिलांसाठी जास्तीचे लोन प्रदान केले जाते. या योजनेसाठी 18 वर्ष पूर्ण झालेला कोणताही व्यक्ती पात्र आहे.
प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम : 
प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमांतर्गत नवनवीन लघु उद्योगांची स्थापना केली जाते. एवढेच नाही तर शहरी भागांमध्ये रोजगाराची संधी उत्पन्न करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मदत देखील केली जाते. या योजनेअंतर्गत ग्राहकाला 25 लाख रुपयांपर्यंत लोन प्रदान केले जाते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		