12 December 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

EPF Pension | EPFO चा नियम, 58 वर्ष होण्याआधीच सुरू होईल दरमहा पेंशन, नेमका काय आहे फंडा पहा - Marathi News

Highlights:

  • EPF Pension
  • 58 वर्ष होण्याआधी कशी प्राप्त होईल पेंशन?
  • 58 वर्षापर्यंत पेंशन सुरू झाल्यास जास्तीत जास्त 7,500 रुपये मिळतील :
EPF Pension

EPF Pension | ईपीएफओ म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघठन’ ही संस्था श्रम मंत्रालय अंतर्गत चालवली जाते. यामध्ये ईपीएफओने 1995 साली सरकारी नोकरी करत नसलेल्या म्हणजेच प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएस 95 म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना 95 ची सुरुवात केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत ही योजना सातत्याने सुरूच आहे.

या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12% भाग आणि कंपनीकडून मिळणारा एक भाग असं दोन्ही भागांचं योगदान कर्मचाऱ्याच्या ईपीएफ अकाउंटमध्ये केलं जातं. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक भाग प्रॉव्हिडंट फंड आणि कंपनीकडून मिळणाऱ्या 12 टक्क्यांमधील 3.67% एवढा भाग कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडेंट फंडमध्ये तर, दुसरा 8.33% हा भाग ईपीएसमध्ये जमा केला जातो. ज्यामुळे तुमचं रिटायरमेंटनंतरच आयुष्य अगदी आनंदात जाण्यास मदत होते. तुम्हाला पैशांसाठी कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही.

58 वर्ष होण्याआधी कशी प्राप्त होईल पेंशन?
तुम्हाला 58 वर्षाच्या आधीच पेन्शन सुरू होऊ शकते. यासाठी तुम्ही तुमच्या नोकरीचे 10 वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे. समजा तुम्ही पूर्ण दहा वर्ष नोकरी करून इपीएस अकाउंटमध्ये पैसे जमा करत असाल आणि त्याचबरोबर तुमचं वय वर्ष 50 पेक्षा जास्त आणि 58 वर्षापेक्षा कमी असेल तर, तुम्ही पेंशनसाठी पात्र ठरू शकता. परंतु 60 वय होण्याआधीच तुम्ही स्पेशल सुरू करून घेत असाल तर, तुमच्या जमा रकमेतून 4% ने पैसे कापून तुम्हाला मिळतील. जर 60 वर्षानंतर पेंशन सुरू झाली तर, 4% ने जास्त व्याजदर दिले जाईल.

58 वर्षापर्यंत पेंशन सुरू झाल्यास जास्तीत जास्त 7,500 रुपये मिळतील :
ईपीएस अकाउंटमध्ये जाणारे पैसे कर्मचाऱ्यासाठी पेंशन फंड म्हणून साठवले जातात. हे पैसे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे रिटायरमेंटनंतर पेंशन स्वरूपात मिळत राहतात. परंतु तुम्ही तुमच्या कामाचे 10 वर्ष योगदान कंपनीमध्ये दिले असेल तर, 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पेंशन सुरू होऊ शकते. यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 रुपयांपासून जास्तीत जास्त 7,500 रुपयांपर्यंत पेंशन प्राप्त होते.

Latest Marathi News | EPF Pension Scheme 21 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF Pension(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x