IRCTC Login | बऱ्याच व्यक्ती ट्रेनमधून प्रवास करताना लोवर बर्थ सीट बुक करणे पसंत करतात. लोवर बर्थ तिकीट बुक करणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. याच कारणामुळे काही जणांना लोवर बर्थ मिळते तर काहींना लोवर बर्थ सीट मिळतच नाही.
प्रवासादरम्यान तुमच्याबरोबर देखील असंच काहीसं झालं तर, काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला लोअर बर्थ सिटी कशी बुक केली जाते याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
आयआरसीटीसी :
ट्रेनमधील लोवर बर्थ सीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसीने एक विशिष्ट प्रक्रिया निश्चित करून ठेवली आहे. तुम्ही IRCTC च्या प्रोसेसला स्टेप बाय स्टेप ऑफ फॉलो केलं तर, तुमची लोअर बर्थ टिकीट लवकरात लवकर बुक होईल आणि तुमचा प्रवास आनंदात जाईल. बहुतांश वेळा ट्रेनमधील लोवर बर्थ सीट ही सीनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी अलॉट करण्यात येते. ज्यामध्ये 45 वर्षांच्या पुढील महिला आणि 60 वर्षांपुढील पुरुषांना गृहीत धरण्यात येते.
केवळ 2 सिनिअर सिटीजन लोअर बर्थ सीट मिळवू शकतात :
IRCTC चा लोअर बर्थसाठीचा नियम तेव्हाच लागू होतो जेव्हा एक किंवा दोन ज्येष्ठांसाठी तिकीट बुक करायचं असेल. समजा तुम्ही दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करत असाल तर, केवळ दोन सिनिअर सिटीजन व्यक्तींना लोअर बर्थचे तिकीट अलॉट करण्यात येते.
तुम्हाला सुद्धा लोअर बर्थ सीट बुक करायची असेल तर, दिल्या गेलेल्या प्रोसेसनुसार सीट बुक करावी लागेल. म्हणजेच 2 सिनियर सिटीजनचा नियम लक्षात ठेवुनच सीट बुक करावी लागेल. जेणेकरून तुम्ही अगदी आरामात आणि झोपून घरी जाऊ शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.