IRCTC Login | आता दिवाळी सण सुरू होईल बाहेरगावी असलेले बरेच लोक दिवाळी सण आपल्या कुटुंबीयांबरोबर साजरी करण्यासाठी ट्रेनचे तिकीट बुक करत असतील. आज आम्ही खास प्रवाशांकरीता एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. एका दिवसाची यात्रा पूर्ण करण्यासाठी प्रवासी तात्काळ किंवा वेटिंग तिकीट बुक करणे पसंत करतात.
सध्या फेस्टिव सीजन असल्यामुळे ट्रेनला देखील प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळणार आहे. दिवाळीच्या एक महिन्याआधीच बरेच व्यक्ती ट्रेनमधील आपल्या हक्काची सीट बुक करून ठेवतात. परंतु तात्काळ तिकीट लवकरात लवकर मिळणे सहज शक्य होत नाही. परंतु आता चिंता करण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला तात्काळ किंवा वेटिंग तिकीट मिळाले नाही तरीसुद्धा तुम्ही अगदी आरामात करंट तिकीट बुक करून आपल्या घरी पोहोचू शकता.
जाणून घ्या सर्व तिकिटांची माहिती :
तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला हवं ते तिकीट बुक करू शकता. ट्रेन चालू होण्याच्या 60 दिवसांआधी तिकीट बुकिंग ओपन होते. त्याचबरोबर तात्काळ कोटा तिकीट बुकिंग ट्रेन सुरू होण्याच्या एक दिवस आधी सुरू होते. हे तिकीट बुकिंग एसी क्लाससाठी 10 वाजता आणि नॉनएसी क्लासे बुकिंग करिता 11 वाजता ओपन होते. परंतु करंट तिकीट हे ट्रेनच्या चार्टिंगवर डिपेंड असते. म्हणजेच सीट रिकाम्या राहिल्यानंतर तुम्ही करंट तिकीट बुक करू शकता. हे करंट तिकीट तुम्ही ट्रेन सुरू व्हायच्या 4 तास आधीच बुक करू शकता. करंट तिकिटेच्या सुविधेमुळे तुमचा प्रवास रद्द होत नाही.
अशा पद्धतीने करता येईल करंट तिकीट बुक :
1 सर्वप्रथम आयआरसीटीसी एप्लीकेशन ओपन करा आणि तुमच्या क्रेडेन्शिअल्सचा वापर करून लॉगिन करून घ्या.
2 पुढे तुम्हाला ट्रेन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा सोर्स त्याचबरोबर डेस्टिनेशन सिलेक्ट करायचं आहे.
3 हे करंट तिकीट असल्यामुळे तुम्ही ज्या तारखेला प्रवास करत आहात तिचं तारीख नमूद करावी लागेल.
4 पुढे तुम्हाला ट्रेन शोधा अशा पद्धतीचा एक ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता उर्वरित ट्रेनमधील सीटांची यादी तुमच्यासमोर उघडेल. यामधील तुम्हाला तुमची आवडती सीट बुक करून घ्यायची आहे
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.