3 May 2025 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

IRCTC Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, जनरल तिकिटासह तत्काळ तिकीट ही नसेल तर 'हा' पर्याय निवडून प्रवास करा - Marathi News

IRCTC Ticket Booking

IRCTC Ticket Booking | IRCTC रेल्वेमध्ये तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला काही दिवसांआधी स्वतःची सीट बुक करावी लागते. यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगिरीचे तिकीट उपलब्ध असतात. ज्यामध्ये जनरल तिकीट, तात्काळ तिकीट आणि इतरही तिकीटं उपलब्ध असतात.

लांबचा प्रवास करणारे बरेच व्यक्ती किंवा गावी जाणाऱ्यांपैकी असणारे व्यक्ती तीन महिने अगोदरच आपल्या सोयीप्रमाणे ट्रेनचे तिकीट बुक करतात. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांना तात्काळ तिकीट बुकिंगची देखील सुविधा देते. परंतु एखाद्या व्यक्तीला अचानक इमर्जन्सी ओढावली आणि त्यांना ट्रेनने प्रवास करावा लागणार असेल परंतु सामान्य किंवा तात्काळ कोणत्याही प्रकारचे तिकीट काढले नसेल तर, असे व्यक्ती करंट तिकीट सुविधा लाभ घेऊ शकतात.

करंट तिकीट म्हणजे नेमकं काय :
करंट तिकीट हे तात्काळ तिकिटापेक्षा देखील अतिशय फास्ट बुक करता येतं. यासाठी तुम्हाला ट्रेन रवाना होण्याच्या काही तास आधी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करण्याची संधी मिळेल. त्यामध्ये तुम्हाला तिकिटांचा चार्ट दिसणार. हा चार्ट ट्रेनमधील रिकाम्या सीटचा असतो. करंट तिकीट सुविधामुळे रेल्वेला आणि सर्वसामान्यांना देखील अधिक लाभ मिळतो. ट्रेन रिकामी ही जात नाही आणि प्रवाशांना देखील केवळ चार तासानंआधी हवी तशी सीट मिळण्यास मदत होते.

अशा पद्धतीने करा करंट तिकीट बुक :
करंट तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेसची खास काळजी घ्यायची आहे.

1) सर्वप्रथम तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत एप्लीकेशनमध्ये जाऊन ट्रेन बटनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमचं डेस्टिनेशन आणि सोर्स स्टेशन सिलेक्ट करायचं आहे.

2) महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तिकीट बुक करत आहात तीच तारीख तुमच्या तिकिटावर असणे गरजेचे आहे.

3) डेस्टिनेशन, सोर्स स्टेशन आणि डिपार्चर डेट निवडल्यानंतर ‘ट्रेन सर्च’ नावाच्या बटनावर क्लिक करा.

4) आता तुमच्यासमोर तुमच्या रूटनुसार अनेक ट्रेन असलेल्या पाहायला मिळतील. म्हणजेच तुमच्यासमोर ट्रेनची लिस्ट आलेली दिसेल.

5) आता तुम्हाला तुमच्या आवडत्या कॅटेगिरीनुसार ट्रेनची सीट बुक करायची आहे. यामध्ये एसी आणि नॉन एसी दोन्हीही उपलब्ध असतात.

6) समजा तुम्ही निवडलेल्या ट्रेनमध्ये एखादं करंट तिकीट उपलब्ध असेल तर, ते ‘CURR_AVBL -‘ या स्वरूपात दर्शवण्यात आले असेल.

7) जास्त डिमांड असलेल्या रूटवर तुम्हाला करंट तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. परंतु व्यस्त रूटवर तुम्हाला चटकन करंट तिकीट उपलब्ध होऊ शकते.

Latest Marathi News | IRCTC Ticket Booking 15 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IRCTC Ticket Booking(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या