नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानखरेदीचे समर्थन करताना, ‘आज आपल्याकडे राफेल विमाने असतात, तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले. सातत्याने टीका होत असताना या राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराचे समर्थन करत नरेंद्र मोदींनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
राफेल खरेदीप्रकरणी यापूर्वी स्वार्थ व आता होत असलेल्या राजकारणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. देशात आज राफेलची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. राफेल असतात, तर खूप काही साध्य करता आले असते असे मोदी म्हणाले. परंतु, त्याच नरेंद्र मोदी यांना भाजपने बोफोर्स तोफांचं कसं राजकारण केलं ते समजून देण्याची वेळ आली आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे.
राफेलवरून विरोधकांवर टीका करताना, राफेल आज असलं असतं तर काय सध्या केलं असत असा सूर मोदी वारंवार लावत आहेत. राफेल येईल आणि त्याचा काय वापर होईल आणि काय साध्य होईल हा भविष्यकाळ असला तरी पाकिस्तान विरुद्धच्या कारगिल युद्धात बोफार्स तोफांनी देशाची तसेच भारतीय लष्कराची काय शान वाढवली होती, याची कल्पना सध्या मोदींना नसल्याचं दिसत आहे किंवा त्यांना त्यात रस नसावा. ज्या बोफोर्स तोफांवरून भारतीय जनता पक्ष तसेच मोदी सरकार आजपर्यंत राजकरण करत आहेत, त्यांनी आधी बोफोर्सने काय सध्या केलं आहे याची जाण ठवावी असं अनेक सुरक्षा तज्ज्ञांना सुद्धा वाटत आहे. कारण त्याच बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात भाजप सरकारची लाज राखली होती याचा त्यांना विसर पडल्याचं दिसत.
