13 December 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Suzlon Share Price | आता नाही थांबणार! 4 वर्षात 2600% परतावा देणारा सुझलॉन शेअर मालामाल करणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. आता गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंगला सुरुवात केली आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 50 रुपये किमतीच्या पार गेला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 54.68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मागील काही वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2600 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 56.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 17.33 रुपये होती. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.93 टक्के वाढीसह 54.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

4 जानेवारी 2008 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 373 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 99 टक्क्यांनी घसरला होता. 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2607 टक्के वाढली आहे. जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 27.06 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 203 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 54.68 रुपये किमतीवर पोहचला होता. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक तब्बल 42 टक्के मजबूत झाला आहे. 1 जानेवारी रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 38.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 35 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 15 July 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(270)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x