 
						Railway for Govt Employees | सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने मोठी भेट दिली आहे. यापुढे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनाही प्रवास करता येणार आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना वंदे भारत एक्स्प्रेस तसेच हमसफर एक्स्प्रेसमधून प्रवास, प्रशिक्षण, बदली आणि निवृत्तीसाठी प्रवास करता येणार आहे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांना शताब्दी आणि राजधानी गाड्यांमध्येच प्रवास करण्याची परवानगी होती.
अर्थ मंत्रालयाने दिली माहिती
अर्थ मंत्रालयाच्या वतीने कार्यालयीन निवेदन जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, यापुढे सरकारी कर्मचारी देखील वंदे भारत ट्रेनमध्ये त्यांच्या टूर आणि ट्रेनिंगसह अनेक कामांसाठी प्रवास करू शकतात. सरकारी अधिकारी आपल्या अधिकृत दौऱ्यात याचा वापर करू शकतात.
विभागाने मंजुरी दिली
मीडिया रिपोर्टनुसार, वंदे भारत एक्सप्रेस आणि हमसफर ट्रेनचा वापर अधिकृत सहलींसाठी केला जाऊ शकतो. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने विचार करून त्याला मंजुरी दिली आहे.
आदेशानंतर या सर्व सुविधा मिळतील
या आदेशानंतर वंदे भारत ट्रेनसह राजधानी किंवा शताब्दी गाड्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या सर्व सुविधा मिळतील, अशी अधिसूचना अर्थ मंत्रालयाने जारी केली आहे.
अधिसूचना काढण्यात आली होती
देशातील पहिली खासगी ट्रेन तेजसचा होणारा तोटा कमी करण्यासाठी सरकारने असे पाऊल उचलले होते, ज्याचा फायदा रेल्वेला झाला होता. 12 सप्टेंबर 2022 रोजी अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने एक आदेश जारी केला होता की, तेजस एक्सप्रेस ट्रेनचा वापर सरकारी अधिकारीही करू शकतात.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		