
Railway Ticket Booking | भारतीय रेल्वे देशभरात रोज हजारो ट्रेन चालवते, ज्यात करोडो प्रवासी प्रवास करतात. याव्यतिरिक्त, हजारो प्रवासी असे असतात, ज्यांना कन्फर्म सीट मिळत नाही. होळी, दिवाळी आणि छठ पूजा अशा मोठ्या सणांच्या वेळी तर ट्रेन्समध्ये परिस्थिती आणखी वाईट होते. पण तुम्हाला माहित आहे का की चार्ट बनल्यानंतर चालू ट्रेनमध्ये देखील कन्फर्म सीट मिळू शकते.
आश्चर्याची बाब अशी आहे की फारच कमी लोकांना रेल्वेच्या या सुविधेबद्दल माहिती आहे, त्यामुळे सीट रिकाम्या असतानाही त्यांना ट्रेनमध्ये जागा मिळत नाही. इथे आपण जाणून घेऊ की चार्ट बनल्यानंतर ट्रेनमध्ये कशी रिकाम्या सीटची माहिती मिळवता येऊ शकते. चार्ट बनल्यानंतर चालू ट्रेनमध्ये रिकाम्या सीटची माहिती मिळवण्याचे दोन सोपे मार्ग आहेत. चला जाणून घेऊया.
IRCTC ॲप
- आपल्या मोबाईल फोनमध्ये IRCTC चा ॲप उघडा.आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करा.
- होम पेज वर ‘Train’ वर क्लिक करा.आता ‘Chart Vacancy’ वर टॅप करा.
- ‘Chart Vacancy’ वर टॅप केल्यानंतर एक नवीन ब्राउझर पेज उघडेल. इथे तुम्हाला ट्रेन नंबर, यात्रा तारीख आणि स्थानकाचे नाव टाकून ‘Get Train Chart’ वर क्लिक करायचे आहे.
- ‘Get Train Chart’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, थर्ड इकॉनॉमी आणि स्लीपर क्लासचा पर्याय दिसेल.
IRCTC वेबसाइट
- IRCTC वेबसाइटवर https://www.irctc.co.in/online-charts/ क्लिक करा.
- ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख आणि स्थानकाचे नाव भरून ‘Get Train Chart’ वर क्लिक करा.
- आता तुम्हाला फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, थर्ड इकोनॉमी आणि स्लीपर क्लासचा पर्याय दिसेल.
- तुम्हाला ज्या वर्गात रिकामी जागा शोधायची आहे, त्यावर टॅप करा. उदा.- जर तुम्हाला स्लीपर क्लासमध्ये रिकामी जागा शोधायची असेल तर स्लीपर क्लासवर क्लिक करा.
- आता तुमच्या स्क्रिनवर स्लीपर क्लासमधील सर्व रिकाम्या जागांची माहिती दिसेल की कोणत्या कोचमध्ये कुठून कुठे कोणत्या नंबरची जागा रिकामी आहे.
खाली सीट मिळताच तात्काळ टीटीईला भेटा आणि भाडं देऊन सीट बुक करा. या सीटसाठी टीटीई तुम्हाला मॅन्युअल तिकीट देईल, ज्यासह तुम्ही तुमची यात्रा पूर्ण करू शकता.