
Railway Ticket Booking | शक्यतो लांबच्या प्रवासासाठी अनेक व्यक्ती रेल्वेच्या मार्गाचा अवलंब करतात. कारण की कितीही लांबचा पल्ला गाठायचं असेल तरीसुद्धा इतर ट्रान्सपोर्टपेक्षा रेल्वे प्रवासाचा खर्च कमी प्रमाणात होतो. अशावेळी लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. गर्दी असल्यामुळे आपल्याला कन्फर्म तिकीट प्राप्त करण्यास थोडी अडचण निर्माण होते. अशावेळी तुम्ही तात्काळ तिकीट बुक करण्याचा विचार करू शकता.
तात्काळ तिकीट तुम्हाला ताबडतोप प्राप्त होते. परंतु तात्काळ तिकीट मिळणे वाटते तितके सोपे नाही. तुमच्या काही छोट्या चुकांमुळे तात्काळ तिकीट कन्फर्म होण्यास गलत होऊ शकते. आज तुम्हाला या बातमीपत्रातून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नेमका कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे पाहूया.
आयआरसीटीसी एप्लीकेशनचा वापर करा :
1. तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळालं नाही आणि तात्काळ तिकीट बुक करायचं असेल तर लवकरात लवकर तिकीट तुम्हाला मिळण्यासाठी आयआरसीटीसी एप्लीकेशन मोबाईलमध्ये सुरू ठेवा आणि लवकरात लवकर स्वतःचं तिकीट बुक करून घ्या.
2. तुम्ही आयआरसीटीसी एप्लीकेशन तुमच्या मोबाईलमध्ये सुरू केल्यानंतर होम पेजेच्या शेवटी more नावाचं ऑप्शन पाहायला मिळेल. यावर क्लिक करून बायोमेट्रिक वेरिफिकेशन सुरू करा. असं करून तुम्ही कॅपच्या कोड आणि OTP बायपास करू शकता.
3. त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स नावासकट भरून घ्यायचे आहेत. कारण की संपूर्ण माहिती भरल्याने तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेची बचत होते आणि तुम्हालाच तिकीट उपलब्ध होते.
ऑटो अपग्रेडेशन पर्याय निवडा :
समजा तुम्हाला तिकीट बुक करताना कन्फर्म तिकीटच हवं असेल तर, समोर असलेल्या प्रवाशांच्या तपशीलावर ‘ऑटो अपग्रेडेशन’ या ऑप्शनवर क्लिक करा. अनेकांना प्रश्न पडला असेल की, ही प्रोसेस का महत्वाची आहे तर, समजा एखाद्या व्यक्तीने स्लीपर क्लास ते तिकीट बुक केले असेल परंतु तिकीट उपलब्ध नसेल तर, तो ऑटो अपग्रेडेशन करून AC कोचचे तिकीट बुक करू शकतो.
फास्ट इंटरनेट सेवा :
तात्काळ तिकीट बुकिंगसाठी वेगवान इंटरनेट असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे नेट चेक करायचे असेल तर, गुगलवर जाऊन meter.net असं सर्च करू शकता याला पिंग नेट असं म्हणतात. समजा हे नेट 100ms पेक्षा अधिक असेल तर, तुमचे नेट प्रचंड स्लो आहे असं समजा. यासाठी तुम्हाला चांगल्या कनेक्शनचे अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर तुम्ही वायफायचा देखील वापर करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.