 
						Railway Ticket Booking | भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या तात्काळ तिकीट कन्फर्म करण्यासाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये तिकिटांची वेळ बदलण्यात आली आहे. बदललेल्या वेळेमुळे प्रवाशांचे आधीसारखे हाल होणार नाहीत. त्यांना पटापट तिकीट कन्फर्म करण्यासाठी मदतच होईल.
बदललेल्या तिकिटांची वेळ :
ज्या व्यक्तींना एसी कोचमधून प्रवास करायचा आहे त्यांना सकाळी दहा वाजता तात्काळ तिकीट बुक करता येणार आहे. त्याचबरोबर नॉन एसीसाठी तात्काळ तिकिटाची वेळ सकाळी 11 वाजताची दिली आहे. तिकिटांची बदललेली वेळ पाहून प्रवासी अत्यंत खूश आहेत. कारण की, ज्या व्यक्तींना अचानक इमर्जन्सीसाठी बाहेर जावे लागत असेल तर त्यांना अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही.
अशा पद्धतीने बुक करता येईल तात्काळ तिकीट :
1. तात्काळ तिकीट म्हणजेच जलद गतीने काढले जाणारे तिकीट होय. हे तिकीट तुम्हाला चटकन मिळण्यासाठी उपयुक्त ठरते.
2. तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
3. त्यानंतर तुम्हाला ‘प्लॅन माय जर्नी’ या ऑप्शनवर दाबायचं आहे. आता तुमच्यासमोर एक प्रकारचे सेक्शन उघडेल ज्यामध्ये तुम्हाला प्रवासाची तारीख त्याचबरोबर कोणत्या तिकीट हवे आहे हे कन्फर्म करायचे आहे.
4. बुकिंग नावाच्या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचे तात्काळ तिकीट कन्फर्म करता येईल. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे म्हणजेच एसी किंवा नॉन एसी तिकीट बुक करू शकता.
5. तिकिटासाठी तुमच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट यांसारखी काही महत्त्वाची कागदपत्रे मागितली जातील. रेल्वे तिकिटाची प्रोसेस करण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
तिकीट कन्फर्म झाल्यानंतर रिफंड मिळणार नाही :
तात्काळ तिकीट कन्फर्म करून तुमचे जाणे कॅन्सल झाले आणि तुम्हाला तिकीट रद्द करून रिफंड मिळवायचे असेल तर ते शक्य होणार नाही. केवळ ट्रेन रद्द झाल्यानंतरच तुमचे तात्काळ तिकटचे पैसे रिफंड केले जातील. त्याचबरोबर तुमचे तिकीट जलद गतीने कन्फर्म होण्यासाठी क्रेडिट कार्ड, यूपीआय त्याचबरोबर इतरही नेट बँकिंगच्या सुविधा वापरा. जेणेकरून तुम्हाला चटकन तिकीट मिळेल.
प्रोसेस आणखीन जलद पद्धतीने होण्यासाठी तुम्ही हाय स्पीडचे नेटवर्क वापरू शकता. कारण की तात्काळ तिकीट जास्त प्रमाणात उपलब्ध नसतात. त्यामुळे तुम्हाला फास्ट नेटवर्किंगमध्ये तिकीट बुक करावे लागेल. रेल्वेने तात्काळ तिकिटांची वेळ बदलून प्रवाशांसाठी सोपे काम केले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		