
Train Ticket Transfer | पूर्वी वाहतूक करणे फार कठीण होते. एका ठिकाणाहून दूस-या ठिराणी प्रवास करत असताना लोक मैलो मैल पाई चालत जात होते. मात्र शासनाने रेल्वेची केवा सुरु केल्याने ही वाहतूक अतिशय सोपी झाली आहे. यात प्रवासात लागणारा वेळ देखील फार कमी झाला. रेल्वेने लांबचा प्रवास करताना आधीच तिकीट बूक करूण ठेवले जाते. मात्र काही कारणास्तव तुमचे प्रवास करणे रद्द झाले की, तुम्ही हे तिकीट देखील रद्द करता. मात्र आता हे तिकीट तुम्ही विकू शकणार आहात. हो हे खरं आहे. रेल्वे प्रवास जर तुम्ही रद्द करत असाल तर तुम्हाला तुमचे रेल्वे तिकीट रद्द करण्याची गरज नाही.
ट्रांसफरची सुविधा
अनेक व्यक्ती प्रवासात तिकीट रद्द करतात. त्यामुळे रेल्वेने तिकीट ट्रांसफरची ही सेवा खूप आधीपासून सुरु केली आहे. मात्र खुप कमी लोकांना या सेवे विषयी माहीत आहे. त्यामुळे नागरिक या सेवेचा फआयदा न घेता एका अर्थाने स्वत:चे नुकसानच करूण घेतात. तुम्ही देखील असे करत असाल तर आता तिकीट रद्द करण्याचा मार्ग न निवडता ट्रांसफर केल्याने तुमचे होणारे नुकसान वाचणार अहे.
तुमचे तिकीट कुणाला ट्रांसफर करू शकता
तिकीट ट्रांसफर करण्याचे काही नियम आहेत. इथे तुम्ही बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तिकीट ट्रांसफर करू शकत नाही. यासाठी तुम्हाला फक्त कुटूंबातील इतर व्यक्तींची नावे निवडण्याची मुभा दिली आहे. तुम्ही तुमचे आई, वडील, मुलं, पती, पत्नी, बहीन, भाऊ यांनाच हे तिकीट ट्रांसफर कर शकता. प्रवास करण्याच्या २४ तास आधी तुम्हला यासाठी अप्लाय करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या तिकीटावरून तुमचे नाव हटवून ज्याच्या नावावर तिकीट ट्रांसफर करायचे आहे त्याचे नाव तिथे नमूद केले जाते.
कसे कराल तिकीट ट्रांसफर
* यासाठी आधी तुमच्या तिकीटाची एक प्रींट आऊट काढूण घ्या.
* त्यानंतर ज्याच्या नावावर तुम्ही तिकीट ट्रांसफर करणार आहात त्या व्यक्तीचा वोटर आयडी आणि आधार कार्ड नंबर घ्या.
* त्यानंतर तुमच्या जवळील रेल्वे काऊंटरवर तिकीट ट्रांसफरचा अर्ज करा.
* पुढील २४ तासात तिकीटावर त्या व्यक्तीचे नाव दिसेल.
* तिकीट ट्रांसफरची प्रक्रीया तुम्ही एकदाच करू शकता.
* एकदाका त्या व्यक्तीचे नाव तिकीटावर आले की, पुन्हा एकदा ते नाव बदलता येत नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.