19 May 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Multibagger Stocks | संयम खूप महत्वाचा, या शेअरने 1-2 पटीने नव्हे तर 3550 पटीने परतावा दिला, शेअर आजही खरेदीसाठी खास

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसा कमावण्यासाठी संयम खूप गरजेचा आहे. जे लोक संयम ठेवून गुंतवणूक करतात, तेच शेअर बाजारातून चांगला पैसा कमवू शकतात. शेअर बाजारात पैसा हा खरेदी-विक्रीने नाही तर संयम राखून योग्य वेळ आल्यावर प्रॉफिट बुक करून कमावला जातो. असेच काहीसे बजाज फायनान्सच्या शेअरबाबत खरे ठरले आहे. दीर्घ मुदतीसाठी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना आता बंपर परतावा मिळाला आहे. मागील 24 वर्षात बजाज फायनान्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3550 पट अधिक परतावा कमावून दिला आहे.

गुंतवणुकीत अनेक पटींनी वाढ :
15 ऑक्टोबर 2022 रोजी बजाज फायनान्सचा शेअर NSE निर्देशांकावर 7275 रुपयेवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 5220 रुपये होती. आणि 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8050 रुपये आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी 5 ऑक्टोबर 2012 रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये 119.63 पैसे या दराने गुंतवले असते तर त्यांना 835 शेअर्स मिळाले असते, आणि आज त्या शेअर्सची किंमत 60 लाख रुपयांपेक्षा अधिक राहिली असती.

बजाज फायनान्सचे तिमाही निकाल :
2022-23 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा दुपट वाढला होता. यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या कंपनीने 1,002 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी, चालू वर्षात कंपनीने 2,596 कोटी रुपये नफा कमावला आहे. पत वाढल्यामुळे कंपनीची मजबूत कमाई झाली आणि कंपनीच्या नफ्यात वाढ झाली. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 38 टक्क्यांनी वाढले होते आणि कमाई 9,283 कोटी रुपये झाली होती. तर, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 6743 कोटी रुपये नोंदवले गेले होते. कंपनीच्या उत्पन्नातील वाढीचा मुख्य स्त्रोत म्हणजे व्याज उत्पन्न आहे. जून तिमाहीत कंपनीचे व्याज उत्पन्न 33 टक्क्यांनी वाढून 7,920 कोटी रुपयावर गेले होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ही व्याज उत्पन्न 5,954 कोटी रुपये होते.

स्टॉकमध्ये भरघोस वाढ :
18 एप्रिल 1996 रोजी बजाज फायनान्सचा शेअर 5 रुपये 78 पैशांवर ट्रेड करत होता. दोन वर्षांनंतर, 21 ऑगस्ट 1998 रोजी त्याची किंमत घसरून 2 रुपये 4 पैसे इतकी राहिली होती. 22 वर्षांनंतर, 15 ऑक्टोबर 2022 रोजी, बजाज फायनान्सचा स्टॉक BSE निर्देशांकावर 7,275 रुपयांपर्यंत वाढला आहे. जर तुम्ही 21 ऑगस्ट 1998 रोजी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर तुमची गुंतवणूक 3550 पटीने वाढून 35 कोटी 66 लाख रुपये झाली अस्ती. हा स्टॉक मागील 5 वर्षात 299.99 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 7.50 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 0.02 टक्के इतका नगण्य परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या शेअरची किकात 0.20 टक्के पडली आहे. या स्टॉकने 2022 या चालू वर्षांत फक्त 0.78 टक्के कर परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks Of Bajaj Finance share price return on investment on 17 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x