2 May 2025 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

VIDEO | ऑर्डर कँसल केल्यामुळे झोमॅटो डिलीव्हरी बॉयने फोडले महिलेचे नाक

Cruel delivery boy, Zomato,  Cancelling food order, fractures nose bone

बंगळुरू, ११ मार्च: बंगळुरुत ऑर्डर कँसल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने महिलेचे बुक्की मारुन नाकाचे हाड तोडल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डिलीव्हरी बॉयला अटक केली आहे. त्या डिलीव्हरी बॉयने महिलेच्या नाकावर इतक्या जोराने बुक्की मारली की, त्या महिलेच्या नाकाचे हाड तुटले आणि रस्क्तस्राव सुरू झाला. या घटनेचा एक व्हिडिओदेखील त्या महिलेने शेअर केला आहे. (Cruel Zomato delivery boy arrested after attack on women over cancelling food order fractures in nose bone)

एक तास उशीराने पोहचला डिलीव्हरी बॉय:
या घटनेबाबत जखमी महिला हितेशा हिने सांगितले की, तिने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता झोमॅटोवरुन ऑर्डर दिली होती. पण, डिलीव्हरी बॉय साडेचार वाजेपर्यंत न आल्यामुळे तिने ऑर्डर कँसल केली. काही वेळानंतर डिलीव्हरी बॉय आला, पण महिलेने ऑर्डर घेण्यास नकार दिला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यादरम्यान आरोपीने महिलेच्या नाकावर जोराने बुक्की मारुन तेथून पळ काढला.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कंपनीने सोशल मीडियाद्वारे या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. कंपनीने म्हटले की, हा खूप खराब अनुभव होता. आमचा स्थानिक प्रतिनिधी लवकरच तुमच्या मदतीला येईल. या प्रकरणी आम्ही योग्य ती कारवाई करणार.

 

News English Summary: The incident took place on Tuesday when a delivery boy punched a woman and broke her nose bone after cancelling an order in Bangalore. Police have arrested the accused delivery boy in the case. The delivery boy punched the woman in the nose so hard that the woman’s nose bone broke and she started bleeding. The woman also shared a video of the incident.

News English Title: Cruel Zomato delivery boy arrested after attack on women over cancelling food order fractures in nose bone news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या