मुंबई, २१ ऑगस्ट | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल (Fourth case filed against IPS Parambir Singh in ransom Case) :

विमल अग्रवाल नावाच्या हॉटेल व्यावसायिकानं दाखल केलेल्या तक्रारीत परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाझ भाटी यांची नावं नमूद केली आहेत. या सर्वांविरोधात खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान आरोपींनी विमल अग्रवाल यांच्याकडून ९ लाख रुपये रोख आणि सॅमसंगचे दोन महागडे फोन खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकूण मिळून ११ लाख ९२ हजारांची खंडणी घेण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

काल रात्री गोरेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा हा चौथा गुन्हा आहे. बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याने ९ लाख रूपयाच्या वसुलीचा आरोप करत ही तक्रार केली आहे. मागील दोन आठवड्यांत सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल होते. या प्रकरणात काही जणांना अटकही झाली आहे. (Fourth case filed against IPS Parambir Singh in ransom Case)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Fourth case filed against IPS Parambir Singh in ransom Case news updates.

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल | व्यापाऱ्याकडून ९ लाख खंडणी आणि महागडे फोन