गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड महत्वाचे | तरी होमगार्ड डीजी परमबीर सिंग गायब?

मुंबई, २३ ऑगस्ट | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीसंदर्भात आरोप लावून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या मोठ्या सुटीवर गेले असून अजुनही ते कामावर हजर न झाल्याने आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या प्रकरणी ईडीकडून देशमुखांविरोधात फास आवळला जात असतानाच परमबीर सिंग यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरत आहे हे येथे उल्लेखनीय.
गृहरक्षक दलाचे संचालक म्हणून परमबीर सिंग काही दिवस कामावर हजर झाले आणि ५ मे रोजी सुटीवर गेले (Home Guard DG Parambir Singh missing since fifth May 2021) :
परमबीर सिंग यांनी मार्च महिन्यात लेटर बॉम्ब टाकला होता. त्यानंतर ते गृहरक्षक दलाचे संचालक म्हणून काही दिवस कामावर हजर झाले आणि ५ मे रोजी सुटीवर गेले. तेव्हापासून ते आजपर्यंत सिंग कामावर हजर झालेले नाही. गृहविभागाकडून दोन वेळा पत्र पाठवून त्यांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. दरम्यान, परमबीर सिंग सध्या चंदीगड येथे असल्याचे बोलले जात आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या चंदीगडमधील घरालाही कुलूप असल्याचे समजते आहे. त्यामुळे परमबीर सिंग गेले कुठे या चर्चांना उधाण आले आहे.
परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले: (Home Guard DG Parambir Singh missing since fifth May 2021)
परमबीर सिंग यांच्या अनिल देशमुखांवरील आरोपांसंदर्भातले प्रकरण न्यायप्रविष्ट असताना परमबीर सिंग कुठे आहेत असे विचारले असता ते चंदीगडमध्ये असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, परमबीर सिंग हे आजारी असल्याचे सांगत त्यांच्या औषधोपचारांची कागदपत्रेही पाठविण्यात आली होती. दरम्यान, मोहर्रम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड यांची नियुक्ती महत्वाची असते. मात्र परमबीर सिंग सुटीवर असल्याने सध्या या विभागाचा प्रभार के व्यंकटेशम यांच्यावर सोपविण्यात आलाय.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Home Guard DG Parambir Singh missing since fifth May news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल