15 May 2021 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

UK वॉचडॉग त्यांचं कर्तव्य करतात | भारतीय लॅपडॉग द्वेषयुक्त भाषेला देशभक्ती समजतात

Mahua Moitra, Arnab Goswami, UK watchdog, Republic TV

कोलकत्ता, २४ डिसेंबर: अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील वॉचडॉग म्हणजे ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे. Arnab Goswamis channel Republic TV fined 20 Lakh by United Kingdom regulator.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रिपब्लिक टीव्हीने ब्रिटनमधील वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे जबाबदारी आहे. रिपब्लिक टीव्हीला युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्यांच्या गरळ ओकणाऱ्या पत्रकारितेवरून प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

त्यानंतर रिपब्लिक भारताने २६ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२० दरम्यान ब्रिटिश सरकारच्या कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाकडे म्हणजे ऑफकॉमकडे तब्बल २८० वेळा माफी मागितल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर देखील युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामीला समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर लक्ष करण्यात आलं होतं आणि अजूनही सुरु आहे.

त्यालाच अनुसरून टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी अर्णब गोस्वामी यांना अप्रत्यक्षपणे शेलक्या भाषेत टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “UK वॉचडॉग त्यांचं कर्तव्य करतात, भारतीय लॅपडॉग द्वेषयुक्त भाषेला देशभक्ती मानतात..

 

News English Summary: Good on the UK watchdog for doing its job whereas Indian lapdogs seem to view hate speech as patriotism and reward haters said TMC leader Mahua Moitra over action on Republic TV in Great Britain.

News English Title: Mahua Moitra slams Arnab Goswami after UK watchdog imposed fine to Republic TV for hate speech news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x