26 April 2024 9:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

आंदोलक शेतकऱ्यांनाही भाजप नेते आणि समर्थक देशद्रोही म्हणतात | यापेक्षा मोठं पाप नाही

Congress Leader Rahul Gandhi, March towards Rashtrapati Bhavan, Farm Laws

नवी दिल्ली, २४ डिसेंबर: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारने चर्चेचा आग्रह धरला आहे. शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार कमी अधिक करता येईल, पण आधी चर्चेची तारीख कळवा, अशी भूमिका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी घेतली. त्यावर, आम्ही फेटाळलेल्या दुरुस्त्या सोडून सरकारने नवा प्रस्ताव पाठवावा आणि आम्ही चर्चेस तयार आहोत, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.

दरम्यान मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या आणखीही काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कृषी कायद्यांविरोधात गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे समर्थक देशद्रोही म्हणतात. यापेक्षा मोठं पाप असू शकत नाही, अशा शब्दांत प्रियंका यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

आंदोलनादरम्यान प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार दिशाभूल करु शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. “या सरकारविरोधात असणारे कोणतेही मतभेद दहशतवादाचे घटक असल्याचं सांगितलं जात,” असल्याची टीका त्यांनी केली आहे.

 

News English Summary: Delhi Police take Priyanka Gandhi and other Congress leaders into custody. They were taking out a march to Rashtrapati Bhavan to submit to the President a memorandum containing 2 crore signatures seeking his intervention in farm laws issue.

News English Title: Congress Leader Rahul Gandhi To Lead March towards Rashtrapati Bhavan Over Farm Laws news updates.

हॅशटॅग्स

#PriyankaGandhi(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x