पोर्नोग्राफी प्रकरण | त्यांनी व्हॉट्सअॅपवर न्यूड ऑडिशनचे व्हिडिओ पाठवायला सांगितले होते - मॉडेल झोया राठोड

मुंबई, २९ जुलै | पोर्नोग्राफी तयार करून ते काही ऍपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. २० जुलैला कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर कोठडीची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. काल राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपली, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी किला कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
दरम्यान, मॉडेल झोया राठोडने पॉर्न रॅकेटबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. झोयाने सांगितल्यानुसार, तिला राज कुंद्राकडून अश्लील चित्रपटाची ऑफर मिळाली होती. इतकेच नाही तर हॉटशॉट्स अॅपवर काम करण्यासाठी उमेश कामतने तिला बर्याच वेळा फोन केला होता.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झोयाने सांगितले, ‘उमेशला अटक होण्यापूर्वी त्याचे कॉल येत होते. हॉटशॉट्स अॅपवर काम करणा-या रॉय नावाच्या व्यक्तीनेही तिला यासंदर्भात फोन केला होता. रॉयने सांगितले होते की, तो यूकेमध्ये राहतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉटशॉट्ससाठी न्यूड वेब सीरिज बनवत आहे.’ झोयाने सांगितल्यानुसार, रॉयने तिला त्याच्यासोबत काम केल्यास दररोज 70,000 रुपये देणार असल्याचे म्हटले होते.
व्हाट्सअॅपवर न्यूड ऑडिशनचे व्हिडिओ पाठवायला सांगितले गेले:
झोया म्हणाली की, ‘फेब्रुवारी महिन्यात उमेशच्या अटकेपूर्वी त्याने तिचा अॅडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी होकार मिळवला होता. उमेशने झोयाला ऑफिसमध्ये न बोलावता व्हॉट्सअॅपवर न्यूड ऑडिशन देण्यास सांगितले होते. मात्र, झोयाने यासाठी नकार दिल्यानंतरही उमेशने तिला कॉल करणे सुरुच ठेवले होते. उमेश कामतने तिला अॅडल्ट चित्रपटांसाठी दररोज 20 हजार रुपये ऑफर केले होते.’
शिल्पाच्या PNB खात्यावर क्राईम ब्रँचला संशय:
तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला शिल्पा आणि कुंद्राच्या जॉईंट अकाऊंटची माहिती मिळाली. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) उघडलेल्या या खात्यात वर्षात कित्येक कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. क्राईम ब्रँचला असाही संशय आहे, की Hotshots App आणि Bolly Fame App कडून मिळालेली रक्कम शिल्पा-राजच्या या खात्यावर पाठविण्यात येत होती.तपासात याचीही माहिती मिळाली आहे, की या खात्यात डायरेक्ट ट्रांजेक्शन होत नव्हते. तर वेगवेगळ्या मार्गाने छोट्या-छोट्या रक्कमेने पैसे ट्रान्स्फर केले आहेत. याला टेक्निकली भाषेत प्लेसमेंट, लेअरिंग, इंटिग्रेशनची मोडस ऑपरेंडी म्हणतात. दरम्यान, 23 जुलैला जेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला तेव्हा तिची या विषयीही चौकशी केली गेली.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Model Zoya Rathore made serious allegations on Raj Kundra and Umesh Kamat for asking nude auditions clips on Whatsapp news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON