24 May 2024 12:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 24 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell? IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
x

Mumbai NCB officer Molestation Case | मुंबई NCB अधिकाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग | गुन्हा दाखल

Mumbai NCB officer molestation Case

मुंबई, 08 ऑक्टोबर | मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात नॉक्टोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यानंतर आता मुंबई झोनल ऑफिसचे एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Mumbai NCB officer molestation Case) झालाय. महत्वाची बाब म्हणजे हा गुन्हा विनयभंगाचा आहे. रेल्वेमध्ये प्रवास करताना सहप्रवासी तरुणीचा विनयभंग केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी ही 25 वर्षाची असून ती हैदराबाद ते पुणे प्रवास करत होती.

Mumbai NCB officer molestation Case. The NCB has been in the spotlight in the Mumbai Drugs and Aryan Khan case. After that, a case has been registered against Dinesh Chavan, an NCB officer of the Mumbai zonal office :

एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण हे कोर्टाच्या कामानिमित्त हैदराबादला गेले होते. कोर्टाचं काम आटोपून चव्हाण मुंबईच्या दिशेनं येत होते. त्यावेळी चव्हाण ज्या डब्यातून प्रवास करत होते, त्याच डब्यात तक्रारदार तरुणीही प्रवास करत होती. तक्रारदार तरुणी ही चव्हाण यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या आसनावर बसली होती. प्रवास सुरु असताना दिनेश चव्हाण यांनी तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत संबंधित तरुणीने टीसीकडे तक्रार केली.

त्यानंतर तरुणीने बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे पोलीस ठाण्यात एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली आहे. दिनेश चव्हाण हे एनसीबीचे मुंबई झोनलचे अधिकारी आहे. ते नवी मुंबईतील कोपरखैरने परिसरात वास्तव्याला असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, एका एनसीबी अधिकाऱ्यावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Mumbai NCB officer molestation Case filed against Dinesh Chavan.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x