19 April 2024 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

नोकरदार मुंबईकरांच्या प्रवासाच्या व्यथा समजून घ्या | मनसेचं रेल्वे प्रवास आंदोलन

Sandeep Deshpande, MNS party, Lockdown, Marathi News ABP Maza

मुंबई, २१ सप्टेंबर : सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी सोमवारी मुंबईत मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. त्यानुसार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी निर्बंध झुगारत लोकल ट्रेनने प्रवास केला. मनसेकडून यापूर्वीच सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यानंतर रेल्वे पोलिसांकडून संदीप देशपांडे यांना आंदोलन न करण्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, तरीही संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेने प्रवास केला. त्यामुळे आता रेल्वे पोलिसांकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे सामान्य लोकांना आपले कार्यालय गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, त्यामुळे रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येत असून सामान्य नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहे.

दरम्यान, दिलेल्या घोषणेप्रमाणे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी सकाळी लोकलमधून प्रवास केला. यावेळी प्रवासाचा व्हिडीओ देशपांडे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. “आम्ही अनेकवेळा सरकारला विनंती केली होती की, रेल्वे चालू करा. सर्वसामान्यांसाठी रेल्वे चालू करा. बसमध्ये करोना पसरत नाही, पण लोकलमधून पसरतो, असा सरकारचा समज झाला असावा. आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत, जय महाराष्ट्र,” अशी टीका देशपांडे यांनी सरकारवर केली आहे.

 

News English Summary: Raj Thackeray-led Maharashtra Navnirman Sena (MNS) leaders on Monday violated rules and traveled by the Mumbai local train to protest against the restrictions levied by the state government. After urging the state government to allow general public to also board the local train, MNS leader Sandeep Deshpande along with some other party functionaries broke the rules and reached the platform to board the train.

News English Title: Sandeep Deshpande MNS party Local Travelling Open For All Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x