8 December 2021 7:19 PM
अँप डाउनलोड

NCB and BJP | पण NCB प्रमुख म्हणालेले कारवाई 'विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे' | मुंबई NCB कोणाचा बचाव करतंय?

NCB and BJP

मुंबई, ०७ ऑक्टोबर | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. त्यालाच आता एनसीबीनं पत्रकार परिषद (NCB and BJP) घेत प्रत्युत्तर दिलंय. एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत. विशेष म्हणजे आरोपांमधील मूळ प्रश्नाला बगल देत अधिकाऱ्यांनी भलतंच तुणतुणं वाजवल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे साक्षीदार आरोपींचा हात पकडून कार्यालयात घेऊन येतात हे कोणत्या नियमात बसतं ते सांगणं कठीण झाल्याचं पाहायला मिळालं.

NCB and BJP. We acted on the basis of specific intelligence and then some Bollywood links have come to light,” NCB chief SN Pradhan told ANI on October 3 :

2 तारखेला आम्ही कारवाई केली, त्यावेळी वेगवेगळे ड्रग्स सापडले, त्यावेळी आठ लोकांना अटक केली असं मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना म्हटलं. सारे पंचनामे कायद्याने बनवलेत. स्वतंत्र साक्षीदार आहेत. काही आरोप लावण्यात आलेत, ते बिनबुडाचे आहेत. आमच्यावर जे आरोप केलेत ते चुकीचे आहेत, असंही स्पष्टीकरण एनसीबीनं दिलंय.

एनसीबीच्या कारवाईत वैयक्तिकरित्या मदत केलेल्या साक्षीदारांचीही माहिती यावेळी देण्यात दिली. एनसीबीनं काही व्यक्तींची नावं जाहीर केली. मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांचीही नावं घेतली. “क्रूझवर टाकलेल्या छाप्यासाठी काही जणांनी आम्हाला माहिती देण्याचं काम केलं होतं. संपूर्ण कारवाई कायदेशीर पद्धतीनंच झालेली आहे. या प्रकरणात साक्षीदार म्हणूनही आम्हाला काही जणांनी मदत केली आहे. आमच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही”, असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

NCB प्रमुख ३ ऑक्टोबरला काय म्हणाले होते:
आम्ही दोन आठवड्यांपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे हे परिणाम आहेत. आम्ही विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारावर कारवाई केली आणि त्यानंतर काही बॉलिवूड लिंकचा सहभाग समोर आला आहे असं एनसीबी प्रमुख एसएन प्रधान यांनी ३ ऑक्टोबरला एएनआयला प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.

पुढे ते म्हणाले की, ‘क्रूझवर एका पार्टीदरम्यानच्या धाडीत आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील छापे टाकले जातील असं एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांना माहिती देताना म्हटलं होतं.

मात्र कालच्या मुंबई एनसीबीच्या पत्रकार परिषदेत संबंधित भाजप कार्यकर्त्यांनी (साक्षीदार) आम्हाला माहिती दिली आणि त्यानंतर जहाजावर धाड टाकल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे एनसीबी प्रमुख एसएन प्रधान यांनी विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारावर कारवाई केली असल्याचं म्हटलं होतं. ही विसंगती एनसीबीवर संशय निर्माण करत आहे असंच सध्या म्हणावं लागेल. विशेष म्हणजे मुंबई एनसीबी अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे ज्या एकूण साक्षीदारांनी कारवाईत वैयक्तिकरित्या मदत केली त्यात अनेक साक्षीदार आहेत. मात्र मुंबई एनसीबीच्या कार्यालयात केवळ भाजप संबंधित मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांनाच मुक्त राण असल्याचं सांगणारा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे भाजप संबंधित मनीष भानुशाली आणि किरण गोसावी एकाच गाडीतून एकत्रच प्रवास करतात हे देखील विशेष म्हणावे लागेल.

साक्षीदार आरोपींचा हात पकडून कार्यालयात कसे घेऊन जाऊ शकतात, NCB कोर्टात फसणार?
नियमानुसार कोणताही सामान्य माणूस एखाद्या सरकारी संस्थेच्या कारवाईत उदाहरणार्थ NCB’च्या कारवाईत थेट संबंधित प्रकरणातील आरोपींना हात लावून थेट अधिकाऱ्यांच्या भूमिकेत जाऊन त्यांना कार्यालयात घेऊन जाऊ शकत नाहीत. अगदी खबरी किंवा संबंधित प्रकरणातील साक्षीदार देखील अशी भूमिका बजावू शकत नाहीत. जर कारवाईच्या ठिकाणी अधिक लोकं असतील तर कारवाईदरम्यान स्थानिक पोलिसांना तशी कल्पना देऊन त्याप्रमाणात पोलिसांची कुमक बोलवावी लागते. मग NCB अधिकाऱ्यांनी असं धाडस करून नियम धाब्यावर कसे बसवले असा प्रश्न न्यायालयात उपस्थित झाल्यास NCB नक्कीच कायद्याच्या कचाट्यात फसेल. विशेष म्हणजे त्या भाजप कार्यकर्त्यांचे तसे व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCB and BJP party clarification increases confusion after Mumbai NCB press conference.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x