15 December 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

API दर्जाच्या अधिकाऱ्याला कोणी १०० कोटी रुपयांचं टार्गेट देईल हेच मनाला पटत नाही - IPS कृष्ण प्रकाश

Pimpri Chinchwad, Police Commissioner Krishna Prakash, recovery Target of 100 crore, Anil Deshmukh

पिंपरी, २३ मार्च: महाराष्ट्राचे गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे देतील, टार्गेट दयायचेच असेल तर पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देतील, त्यामुळे यात तथ्य वाटत नाही, जे अधिकारी चुकीचे काम करतात, त्यांनाच टार्गेट दिले जाते, असे पिंपरी -चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट असून चुकीला माफी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्यानेही काही दिवसांपुर्वी अशाप्रकारे एक पत्र दिल्याचे समोर आले होते. त्या पत्रात कोट्यवधी रुपयांच्या हप्ता वसुलीचा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, मुंबई पोलिस दलातील शंभर कोटी वसुलीच्या पत्राबाबत कृष्ण प्रकाश यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जे अधिकारी चुकीची कामे करतात, त्यांनाच असे टार्गेट दिले जाते.

पिंपरी चिंचवडला भयमुक्त करणं हे आमचं टार्गेट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यातून वसुलीसंदर्भातलं पत्र व्हायरल झाले. त्या संबंधित प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, असं कृष्णप्रकाश म्हणाले. शहरात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो… तो सरकारचा समर्थक असो वा विरोधातला, त्याच्याशी पोलिसांचा संबंध नाही. कारण गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, त्याने केलेल्या चुकीचं शासन त्याला होईल, असंही कृष्णप्रकाश म्हणाले.

 

News English Summary: Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishna Prakash has said that the Home Minister of Maharashtra will give a target of recovery of Rs 100 crore to an Assistant Inspector level officer. Done. He also clarified that our target is to make Pimpri-Chinchwad fear-free and there is no excuse for wrongdoing.

News English Title: Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash talked on target of recovery of Rs 100 crore news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x