2 May 2025 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

केरळस्थित पत्रकार 5 ऑक्टोबरपासून युपीच्या तुरूंगात | सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस

Supreme Court, Kerala journalist Siddique Kappan, Hathrasa

नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर: केरळमधील पत्रकार सिद्दिक कप्पन यांना उत्तर प्रदेशातील हाथरास येथे जात असताना योगी सरकारकडून अटक करण्यात आली होती. संबधित अटकेविरोधात सवोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. हाथरास येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि धक्कादायक म्हणजे तिचा इस्पितळात मृत्यू झाल्यावर युपी पोलिसांनी स्वतःच अंत्यविधी उरकला होता.

मुख्य न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट्स (केयूडब्ल्यूजे) ला प्रश्न विचारला की ते अलाहाबाद हायकोर्टाकडे ना जाता थेट सुप्रीम कोर्टात का धाव घेतली. तसेच आम्ही नोटीस बजावू. आम्ही शुक्रवारी ही सूचना ठेवत आहोत,” असे खंडपीठाने सांगितले, पत्रकार असोसिएशनतर्फे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

सिब्बल म्हणाले की, “एफआयआरमध्ये त्याचे नाव नाही. सदर पत्रकारावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. 5 ऑक्टोबरपासून तो तुरूंगात खितपत पडला आहे,” असे सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला नोटीस बजावली आहे.

 

News English Summary: Siddique Kappan, a journalist from Kerala, was arrested by the Yogi government on his way to Hathras in Uttar Pradesh. A petition was filed in the Supreme Court against the arrest. The apex court on Monday issued notice to the Uttar Pradesh government on the petition. A girl was gang-raped in Hathras and shockingly, UP police conducted the funeral itself after she died at the hospital.

News English Title: Supreme Court issues notice on plea against arrest of Kerala journalist Siddique Kappan during Hathras News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या